खासगीपण जपण्याचे धोरण
कृषीप्रधान टीव्हीच्या https://www.krushipradhan.com या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.
माहिती जमा करणे आणि साठवणे
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा.windows, mac, mobile browser) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. jio, idea, Airtel, Vodafone, BSNL, Brodband, Lease Line, RailWire. etc), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.
तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे त्रयस्थ तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (तुमचे नाव, पत्ता, इ-मेल इ. यांचा समावेश यामध्ये असणार नाही.) गोळा केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती तुमच्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
प्रश्न/ तक्रारीचे निराकरण
निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्या कडे खाली दिलेल्या पत्त्यावर लिखित स्वरुपात अथवा krushipradhan.tv@gmail.com इमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.
धिरज मानमोडे,
मुख्य संपादक, कृषीप्रधान टीव्ही
कृषीप्रधान फिल्म्स अँड मीडिया प्रा. लि.
अमरावती - महाराष्ट्र - ४४४६०२
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार कराल तेव्हा ती थेट त्या व्यक्तीशीच संबंधित असली पाहिजे. तसेच तुम्ही नोंदवलेल्या घटनेशी त्या व्यक्तीचा थेट संबंध असला पाहिजे. वाद-विवाद निर्माण होऊ शकणारी, एकांगी किंवा दूरचा संबंध जोडलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
टीप : सदर न्यूज पोर्टल वर प्रकशित होणाऱ्या बातम्या, माहिती, मजकूर यांच्याशी संपादक अथवा कृषीप्रधान टीव्ही टीम सहमत असेलच असे नाही.