तिवसा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी प्रतिभा गौरखेडे
अविरोध झाली निवड : माजी आमदार यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व अबाधित
अमरावती - तिवसा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी कॅांग्रेसच्या प्रतिभा वसंतराव गौरखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी त्यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली. सभेच्या वेळी कॅांग्रेसचे १५ तर विरोधी गटातील चार सदस्य उपस्थित होते. विरोधकांकडून एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्ष योगेश वानखडेयांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निव़डणूक घेण्यात आली.
पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कामकाज पाहीजे. निवड प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली. नगरपंचायतीचे सर्व १९ सदस्य उपस्थित होते. यामध्ये कॅांग्रेसचे योगेश वानखडे, किसन मुंदाणे, अमर वानखडे, प्रिया विघ्ने, प्रिती भुरभुरे, संगीता राउत, मंगला वानखडे, नरेंद्र लांडगे, अर्चना भोंबे, माधुरी पुसाम, प्रतिभा भगत, सीमा खाकसे यांच्यासह स्वीकृत सदस्य सचिन गोरे, वैभव वानखडे आदी सदस्य उपसथित होते. तर विरोधी गटातील चार सदस्य उपस्थित होते. नगराध्यक्षांची हंगामी जबाबदारी सांभाळणा्या उपाध्यक्षा प्रिया विघ्ने यांनी अध्यक्षपदाचा पदभार नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतिभा गौरखेडे यांच्याकडे सोपविला.
यावेळी तहसीलदार आशीष नागरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रतिभा गौरखेडे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला. अॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात साजरा झालेल्या जल्लोषाच्यावेळी माजी सभाती दिलीप काळबांडे, तालुका कॅांग्रेसचे माजी अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, शहराध्यक्ष सेतु देशमुख, नितीन मेहकरे, नरेंद्र विघ्ने, गजानन भोंबे, दिवाकर भुरभुरे, उमेश राउत, प्रणव गौरखेडे,प्रमोद वानखडे यांच्यासह शेकडो कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.