वर्धा जिल्यातील नेरी (मिर्झापूर )ठरणार राज्यातील सर्वात मोठे ऊर्जा ग्राम

आदर्श गाव मिर्जापुर (नेरी) हे पुनर्वशीत गाव म्हणून नावारूपास आले. या गावातील लोकांनी आपली शेतजमीन,आपलं घरदार, सर्व गमावला आणि आर्वीपासून अगदी हाकेच्या अंतरावर पुनर्वसित झाले. पुनर्वसित गाव म्हणजे समस्यांचे माहेरघरचं.. रोड, नाल्या, घरदार सर्व नव्याने कराव्या लागणार. असे एक नवीन गाव अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई होती. रोजंदारीचा यक्षप्रश्न होता, हे असे सर्व प्रश्न पदरात घेऊन हे गाव नव्याने आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अशातच या गावांमध्ये होतकरू तरुण म्हणून ख्याती असणारे, उच्चविद्याविभुषित व सद्यस्थितीत गावातील सरपंच बाळासाहेब सोनटक्के यांनी गावाची धुरा हाती घेतली. गावातील निवडणुका बिनविरोध करून गावासाठी बक्षीस मिळवले. आणि अशातच या गावाला परिसस्पर्श झाला पाणी फाउंडेशनचा. पाणी फाउंडेशनच्या रूपाने बाळाभाऊ सोनटक्के यांना जणू काही संजीवनीच मिळाली. वेगवेगळ्या गावी जाऊन प्रशिक्षण घेतल्यानंतर गावात त्यांनी पाणी फाउंडेशनचे काम जोमात सुरू केले. पाणी फाउंडेशनच्या कामातून निवळ जलसंवर्धनाचे काम न करता मन संवर्धनाचे काम देखील करण्याचं त्यांनी ठरविले. आणि या कामांमध्ये स्वतःला पूर्णता झोकून दिल. पूर्ण गाव एक झाल, आर्वीतील विविध सामाजिक संघटनांची मदत मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची स्वीय सहाय्यक बाळाभाऊंचे मित्र विद्यमान आमदार सुमितजी वानखडे यांनी पावलोपावली बाळाभाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवत त्यांना मदत केली. कामाचा झंजावत बाळाभाऊ सोनटक्के यांनी गावात सुरू केला. आणि याचीच फलनिष्पत्ती म्हणून निरी मिर्झापूर गाव हे जिल्ह्यातून दुसरे आले. आणि गावाला बक्षीस मिळाले. तिथपासून गावाचा पारितोषकांचा क्रम सुरू झाला तो आजपर्यंत थांबत नाही. योजना अथवा शासकीय कोणताही कार्यक्रम असो किंवा शासकीय गावासाठीची कोणती स्पर्धा असो त्यामध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय या तिन्ही स्तरावर गावांनी आतापर्यंत जवळपास दीड कोटीच्या घरात बक्षीस मिळवली. याचं सर्व श्रेय जरी गावाला जात असलं तरी गावाला तिथपर्यंत घेऊन जाण्यामागे मोठा वाटा गावातील सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांचा आहे.
गावातील कुठलाही सुखद अथवा दुःखद प्रसंग असो. त्यामध्ये सर्वप्रथम आठवण केल्या जाते ती सरपंच म्हणून बाळाभाऊ सोनटक्के यांचीच. गावातील कोणाच्याही घरचा कुठले प्रसंग असल्यास आवर्जून आपली सर्व कामे बाजूला सारून त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना मदत करतात, त्यामुळेच त्यांच्या कामाचा आवाका बघता त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची तिकीट देखील देण्यात आली आणि ते निवडून देखील आले. आज जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीवर देखील त्यांची वर्णी लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून देखील आपले कार्याचा त्यांनी वेगळा ठसा उठावला आहे.
आदर्श ग्रामपंचायत किंवा आदर्श गाव म्हणून आपण हिवरेबाजार सारख्या ठिकाणी विदर्भातील लोक जात असतात. बाळाभाऊंचा मानस आहे की आदर्श गाव कशाला म्हणतात हे बघण्यासाठी विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातले लोक माझ्या गावाला यायला पाहिजे हा मानस त्यांनी कित्येकदा बोलून दाखविला. गावासाठी झपाटून काम करणारा माणूस, गावासाठी झपाटून काम करणारा सरपंच म्हणून आज बाळाभाऊ सोनटक्के यांच्याकडे संपूर्ण जिल्हा पाहते. गावात विविध शासकीय योजनेतून कशाप्रकारे निधी खेचून आणायचा त्याच्या संदर्भात उचित मार्गदर्शन आजही बाळाभाऊ इतर सरपंचांना करत असतात. अशा या मिर्झापूर नेरी या गावाला आपण जरूर भेट द्यावे. जेणेकरून त्या गावाचा त्या गावातील लोकांचा व त्या गावचे सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांच्या कार्याचा आपल्याला जवळून परिचय घेता येईल. अशा नेरी मिर्झापूर येथील सरपंच बाळासाहेब सोनटक्के यांच्या कार्याला मनापासून सलाम.
लेखन...... ✍🏻
प्रा. दर्शन चांभारे