फोर्ब्सचे दोन पुरस्कार अॅड. डॉ क्षीतिजा वानखेडे यांना प्रदान
सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट विधीज्ज्ञ म्हणून मिळाला मान
आर्वी : वर्धेच्या कन्या आणि आर्वीच्या स्नुषा अॅड. डॉ. क्षीतिजा वानखेडे यांना (वडतकर) यांना आंतर राष्ट्रीय दर्जाच्या फोर्ब्सतर्फे दोन पुरस्कार २०२३ मध्ये जाहीर करण्यात आले होते. ते पुरस्कार २१ रोजी ताज पॅलेस दिल्ली येथे आयोजित शानदार कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिंदल, न्या. माहेश्वरी व महाधीवता व्यंकट रमय्या यांच्या हस्ते डॉ. क्षीतिजा वानखेडे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार पटकावणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
आंतर राष्ट्रीय फोर्ब्स मासिकाच्या वतीने तीन वर्षातून एकदा देण्यात येणार्या ‘फोर्ब्स लिगल पावरलिस्ट’ या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानासह उत्कृष्ट संस्थापक आणि उत्कृष्ट वकील या यादीत त्यांना पुरस्कार देण्यात आला. दोन श्रेणीत स्थान मिळविण्याचा बहुमान मिळविणार्या त्या भारतातील पहिल्या महिला वकील ठरल्या आहेत. २००७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट वता, २०२३ मध्ये ‘इंडिया टू डे’ या प्रसिद्ध मासिकाने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिलांमध्ये अॅड. क्षीतिजा वानखेडे यांना सन्मानित केले आहे. ‘संविधान व मानवाधिकार’ या विषयात केलेल्या संशोधनाबद्दल नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉटरेट पदवी बहाल केली आहे. त्या प्रसिद्ध ‘लॉ फर्मच्या’ संस्थापक आहेत.
कुणाचा आधार नसताना १५ वर्षापूर्वी गुणवत्ता व पदकांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन आपण वर्धेहून मुंबईला पोहोचले. मात्र, कायद्याच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यास प्राधान्य दिले. महिला व वंचित घटकास त्यांचे सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले.
’फोर्ब्स’ मध्ये सादर केलेल्या माहितीचा कागदोपत्री पुरावा, साक्षीदारांचा तपशील, ज्युरी मंडळी आर्वजून तपासतात म्हणून या प्रकियेत सादर करणार असलेली प्रत्येक बाब प्रामाणिक असावी याकडे ’फोर्ब्स’ कटाक्षाने लक्ष दिले जाते हा बहुमान कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारा असल्याचे डॉ. क्षीतिजा वानखेडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.