आर्वीत पेट्रोलमध्ये भेसळ..? नागरिकांच्या गाड्यांमध्ये बिघाड...

आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे पेट्रोल मध्ये भेसड झाल्याने तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना दिले निवेदन...


आर्वी : येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये भेसळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आर्वीतील नागरिकांनी तहसीलदार हरीश काळे यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांना निवेदन पाठवण्यात आले. 

आर्वी या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसापासून भेसळ युक्त पेट्रोल आल्याने लोकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला,  या माध्यमातून लोकांची पैश्याची लूट पेट्रोल विक्रेत्या कंपनी तर्फे झाली. ज्या दुचाकी गाडी दुरुस्ती करणारे कारागीर गाडी पुन्हा पुन्हा येत असल्याने त्यांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

या भेसळ युक्त पेट्रोल मुळे दुचाकी गाड्या ऍटोमॅटिक रेस होत आहे, या मुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढाची शक्यता आहे. बऱ्याच गाड्याचे इंजिन मध्ये बिघाड झाले. त्या मुळे लोकांना पैश्याचा चुराडा झाला याला जबाबदार कोण सरकारने या नंतर असे होऊ नय याची दक्षता घ्यावी असे निवेदन तथा इशारा आदर्श एकता सामाजिक संघटना महा राज्य तर्फे देण्यात आला.

या वेळी गौतम अशोकराव कुंभारे, संजय हाडके, मंगेश सरोदे, आवेश कुरेशी, मनीष पायले, छोटू डोंगरे, सुरेंद्र पखाले अमोल रंगारी, अनिल तायडे, मैबूब शेख, गोपाल आत्राम, अमोल वंजारी, लक्की वंजारी, महेश ठाकूर दूचाकी कारागीर व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Previous Post Next Post