सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे दिनदर्शिकेचे झाले लोकार्पण
आर्वी : येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय सकल समाजाचे (लोहार, गाडी लोहार ,चीतारी, जिनगर) शाखा आर्वीच्या वतीने नववर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण संपन्न झाले आहे. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचा मोठा हातभार समाज निर्मितीत सर्वत्र आहे. परंतु हे समाज बांधव विखुरलेले असल्याने कायमच दुर्लक्षित राहिले आहे. असे असले तरी हा समाज कर्तृत्वाने परीचित आहे.
या समाजासाठी शासनाचे इतर समाजा प्रमाणे ठोस निर्णय झालेले नाही. त्यामुळे हा समाज शासकीय लाभा पासून कायमच वंचित असतो. त्यामुळे या समाजाची आर्थिक स्थितीही जेमतेम अशीच आहे. आर्थिक विवंचना असतांनाही विखुरलेला समाज सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. याच एक भाग म्हणून आर्वी येथे या समाजाचे नववर्षाच्या निमित्ताने दिनदर्शिकेचे लोकार्पण मंडळाच्या मान्यवरांनी केले. विखुरलेला समाज एकसंध बांधण्यासाठी समाजातील होतकरूंनी कंबर कसली आहे. आजवरच्या घडामोडीत वंचित राहिलेल्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दिनदर्शिकेचे लोकार्पण प्रसंगी प्रमुख उपस्थिती चंदू बिंड (नागपुर शहर अध्यक्ष), मनोज बींड (विदर्भ अध्यक्ष), मयूर सूर्यवंशी, आकाश दारलिंगे , पुरुषोत्तम वानखेडे ,श्रीकांत ताजनेकर, प्रवीण सूर्यवंशी (आर्वी शहर अध्यक्ष), नितीन सूर्यवंशी, गजानन तीवसकर, रवी काळे, गोपाल काळे, संजय ताजनेकर, योगेश ताजनेकर आदींची उपस्थिती या प्रसंगी होती.