तिवसा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण
सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा वाहीली श्रद्धांजली
तिवसा : भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरल्यानंतर देशात सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे.
डॉक्टर मनमोहन सिंग यांचे या देशाच्या आर्थिक जडणघडणीत आणि देशाच्या जीडीपी मधील सुधारणा यात मोलाचे योगदान आहे, त्यांचे योगदान न विसरणारे असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दिवसा तालुका व तिवसा शहर च्या वतीने सर्व पदाधिकारी व कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख, संविधान प्रचारक सोमनाथ सूर्यवंशी या दोन युवकांच्या झालेल्या हत्याच्या संदर्भात सुद्धा माणुसकीला काडीमा फासणारा या घटना विरोधात निंदा व्यक्त करत, त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मोहनराव वानखडे, ज्ञानेश्वरराव केचे, नरेंद्रकाका माळोदे, रमेशराव डहाके, माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, वसंतराव जीरापुरे, योगेशराव वानखडे नगराध्यक्ष ,सतीशराव पारधी तालुका अध्यक्ष ,वैभव स. वानखडे, शहर अध्यक्ष सेतूभाऊ देशमुख, डहाके, सुनीलभाऊ बाखडे, रुपालीताई काळे, मुकुंदराव पुनसे, गजाननराव भोंबे, नितीनभाऊ मेहकरे, छत्रपती डोंगरे शब्बीरभाऊ शहा, श्यामभाऊ कोंडे, सुरेशराव उईके, रवी धुर्वे,मनुताई वरठी, नगरसेविका माधुरीताई पुसाम, नगरसेविका प्रीतीताई भूरभुरे, सारिकाताई दापूरकर,पूनमताई काळमेघ, नगरसेवक नरेशभाऊ लांडगे, नगरसेवक अमरभाऊ वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ विघ्ने,माजी नगरसेवक दिवाकरभाऊ भूरभुरे, मुरलीधरराव पोल्हाड, उमेशभाऊ राऊत, वैभव काकडे, प्रशिक शापामोहन,अनंत शेंद्रे,विशाल शापामोहन, अनिकेत प्रधान, श्रावण तायवाडे,राज निकाळजे, अक्षय कुरवाडे, आदी पदाधिकारी, काँग्रेस कमिटी सदस्य उपस्थित होते