भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घेऊन यशोमती ठाकूर यांना दिले समर्थक

भाजपाच्या नरेंद्र राऊत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घेऊन यशोमती ठाकूर यांना दिले समर्थक



धिरज  मानमोडे प्रतिनिधी : 

अमरावती :  भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण आणि तिवसा तालुक्यातील गटबाजीला कंटाळून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नरेंद्र राऊत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे नेते तथा नैसर्गिक शेती सेलचे मुख्य संयोजक आणि अमरावती विधानसभा प्रभारी नरेंद्र राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला हादरा बसला असून त्यांनी तिवसा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार यशोमती ठाकूर यांना पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. नरेंद्र राऊत हे भाजपाच्या जिल्हा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष असून त्यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे.तिवसा मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या नवीन उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे नरेंद्र राऊत नाराज झाले. 

भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता गडबाजीचे राजकारण होत असल्याने तिवसा मतदार संघात प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा नेतृत्वाने देखील याची दखल घेतली नाही. जुन्या जाणत्या निष्ठावंत लोकांना डावलून भाजपा आपल्या आडमुठी धोरणावर ठाम आहे. शेतीमालाला भाव नाही, कार्यकर्त्यांना वाव नाही, त्यामुळे आपण शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे नरेंद्र राऊत यांनी सांगितले. मलिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

तिवसा तालुक्यातील भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे. गुरुकुल मोझरी येथे झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र राऊत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Previous Post Next Post