महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून गद्दारी केली - उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ

महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून गद्दारी केली

उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ

यशोमती ठाकूर यांचा वाघीण असा उल्लेख 

वलगाव येथील विराट सभेतील गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले 


धिरज मानमोडे : प्रतिनिधी -

अमरावती : नुसत्या निवडणूक आल्या की योजनांचा महापुर आणायचा, मात्र रोजगाराचा पत्ता नाही. विरोधकांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आणि सरकार पाडले. माझी बहीण यशोमती ठाकूर ह्या वाघीण आहेत,त्या संकट काळात पाठीशी उभ्या होत्या. सत्तेतील तिघे म्हणजे भाऊ-भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ,अशी यांची ही भाऊबंदकी आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहिणींवर प्रेम दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महिलावर झालेल्या अत्याचाराबद्दल ही बोलावे. ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यात होत आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. आता मात्र दाढीवाला,देवा भाऊ आणि जॅकेटवाल्यांनी राज्य कर्जबाजारी केले असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. 

वलगाव येथील यशोमती ठाकूर यांच्या प्रचार्थ आयोजित येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ वलगाव येथे विराट सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल, खा. अरविंद सावंत, आ. मिलिंद नार्वेकर,काँग्रेस पक्षाचे नेते कुणाल चौधरी, उदय पानसे,महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर, खा.बळवंत वानखडे, रिपाई नेते डॉ. राजेंद्र गवई, माजी खा.अनंत गुढे, विलास इंगोले,श्याम भाऊ देशमुख,सुधीर सूर्यवंशी, आसावरी देशमुख, कांचनमाला गावंडे,गजानन लवटे दिलीप एडतकर, संगीता ठाकरे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की यशोमती ठाकूर ह्या माझ्या मंत्रिमंडळात कर्तबगार मंत्री होत्या,त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगले काम केले असून तिवसा मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे. शेतकरी महिला आणि दुर्बल घटकासाठी यशोमतीने केलेले कार्य प्रशंसनीय आहे. यशोमती सारख्या बुलंद व कर्तबगार नेत्याची राज्याला गरज आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करावं असे आवाहन करून उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडीला नागरिकांची साथ असल्याचे नमूद केले. लोकसभेसारखाच विश्वास विधानसभेतही दाखवावा जेणेकरून येणाऱ्या काळात भ्रष्टाचारी व गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम करू असे प्रतिपादन केले. आपला अजूनही न्यायदेवतेवर विश्वास आहे संविधान मारायला निघालेल्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करा आपली सत्ता नक्की येणारच अजूनही लढाई संपली नाही सर्वांनी दक्ष राहू महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या वर आधारित गीताचे देखील विमोचन करण्यात आले. प्रारंभी उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून गद्दारी केली  उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ  यशोमती ठाकूर यांचा वाघीण असा उल्लेख   वलगाव येथील विराट सभेतील गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले

सभेला विलासराव माहुरे,आशिष धर्माळे,मनोहर बुध, डॉ. नरेंद्र निर्मळ ,भैय्यासाहेब निर्मळ, नाना नागमोते, प्रतिभा बोपशट्टी,तेजस्विनी वानखडे,पराग गुडधे, सागर देशमुख,ज्योती अवघड, आश्विनी इंगळे, प्रवीण आळसपुरे,नितीन हटवार, विजय चप्परिया, हरिभाऊ मोहोड,मनोज देशमुख, किशोर चांगोले,डॉ,चंद्रशेखर कुरळकर,संजय नागोने, मनोज अंबाळकर, प्रकाश काळबांडे, गजानन राठोड,प्रवीण मनोहर, हरीश मोरे, अमित गावंडे, अबरार काशीद, शिल्पा महल्ले मुकद्दर खां पठाण, जयंतराव देशमुख, श्रीकांत बोंडे, सतीश पारधी,वैभव वानखडे, रमेश काळे,नरेंद्र मकेश्वर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकतंत्र व संविधान वाचवा-बघेल 

ज्या भूमीला महापुरुषांचा वारसा लाभला आहे  त्या भूमीत आज अतिशय गलिच्छ राजकारण केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय दिला जात असतानाच आज सर्वच घटकावर अन्याय होताना दिसत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील नागरिकांनी भाजपाला भुईसपाट करून मोदीविरोधात कौल दिला.आज देशात भयावह परिस्थिती असून संविधान आणि लोकतंत्र धोक्यात आले आहे ते वाचविण्यासाठी आपण महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं.असे आवाहन केले. 

महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून गद्दारी केली  उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ  यशोमती ठाकूर यांचा वाघीण असा उल्लेख   वलगाव येथील विराट सभेतील गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले


ये जनता है सब जानती है 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या,महिला वरील अत्याचार, तोडफोडीच राजकारण, वाढती गुन्हेगारी याला कंटाळून महाराष्ट्रातील जनता पुन्हा महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देतील. सत्तेतील कमिशनखोर आणि चोरांना घरी बसवा. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही आधार न घेता संविधानाची तोडफोड करणाऱ्या आणि जातीत तेढ निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करा असे आवाहन करून यशोमती ठाकूर यांनी ये जनता है सब जानती है असे सांगून विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.

Previous Post Next Post