"महायुतीची विकासाची बुलेट ट्रेन सर्वांच्या इच्छा पुर्ण करेल" - नितीन गडकरी 🚩
"भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष" - नितीन गडकरी 🚩
धिरज मानमोडे - प्रतिनिधी
करंजा : भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अनेकांनी आपले आयुष्य खर्च करून पक्षाला वाढविणाऱ्यांचा हा पक्ष आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही तर ते घरातच ठेवल्या जाते. भाजपात असे नाही. सर्व सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान बनतो, मंत्री बनतो. पण काँग्रेस कार्यकर्ते फक्त परीश्रम करण्यापुरते मर्यादित आहे. कार्यकर्तांना केलेल्या परीश्रमाचे मोल घराणेशाही काँग्रेसला नाही. काँग्रेसनी गेल्या 70 वर्षांत शहरी वा ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारंजा येथे सुमित वानखेडेंच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदासजी तडस, सुधीर दिवे, सुनिल गफाट अध्यक्ष भाजपा वर्धा जिल्हा, सरीता गाखरे सचिव महाराष्ट्र राज्य, संदीप काळे, नितीन दर्यापूरकर, अविनाश देव, दिलीप पोटफोडे, चक्रधर डोंगरे, दिलीप जसूतकर, स्वातीताई भिलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सुधीर दिवे, रामदासजी तडस, आमदार दादाराव केचे, सुमित वानखेडे यांनी संबोधित केले.
नितिन गडकरी म्हणाले की, दादारावांचा आशिर्वाद घेऊन सुमित उभा आहे. चांगला मुलगा आहे. तो निवडून आला तर विधानसभेची परीस्थिती बदलेल. जातीपातीचा विचार न करता गुणवत्तेच्या आधारावर सुमितला मते द्या. कारंजात आधी पाणी नव्हते आता महायुतीच्या आपले सरकारमुळे पाणी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती साठी जोडधंद्यातून उद्योग उभारण्यासाठी दुग्ध व्यवसाय चालू करावा. मदर डेअरी च्या माध्यमातून दुधाचे दर वाढले आहेत. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे पाच गाई असल्याच पाहीजे. शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी स्वस्तात पशुखाद्य तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काऊ फार्म तयार करण्याची योजना आहे. येणाऱ्या काळात वर्धा जिल्ह्यात दररोज 5 लाख लिटर दुध होईल यातून शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. आता शेतकरी फक्तं अन्नदाता नाही तर तो आता उर्जा दाता झालाय. आर्वी विधानसभेत 2000 कोटी रुपयांची कामे केली. कारंजा - जलालखेडा - नरखेड - पांढुरना हा एकमेव रस्ता शिल्लक आहे तो ही होईल. आता पर्यंत जी कामे झाली तो फक्त ट्रेलर होता, सुमितला निवडून द्या तो पुर्ण पिक्चर दाखवेल. देशात भाजपाचे भारत सरकारचे इंजीन लावले आता दुसरे महायुतीचे इंजीन लावा आणि विकासाची बुलेट ट्रेन सुसाट वेगाने धावेल. तुमच्या सर्व इच्छा महायुतीचे 'आपले सरकार' पुर्ण करेल असे नितीन गडकरी म्हणाले.
आमदार दादाराव केचेंनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की, मतदारसंघात भाजपचे प्रभुत्व आहे. त्यामुळे सुमित वानखेडे नक्की निवडून येणार. 40 वर्षात विरोधकांनी शेतकऱ्यांचा मतापूरता वापर केला. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेत जमीनी सिंचनाखाली आणल्या. भाजपाने सर्व समाज हित जोपासले तर काँग्रेसने सर्व समाजाचा जाती पातीचे राजकारण करून निवडणूकी पुरता वापर केला. सुमित वानखेडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत विजय आपलाच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुमित वानखेडे म्हणाले की, नेता कसा असावा, आमदार खासदार कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीन गडकरी आहेत. शहरी भागातील असुनही त्यांचे काम शेतकरी, वंचितांसाठी आहे. ते जनतेसाठी समर्पित आहे. दुसरीकडे वर्धेचे खासदार जनतेतून लापता आहे. सहा महिने झाले जनतेसमोर गेलेच नाही. आणि आता त्यांच्या पत्नीच्या प्रचाराला फिरत आहेत. महायुतीच्या सरकारने पाण्याची सोय केली, घरकुल दिले, शौचालय दिले, स्त्रीयांना सन्मान दिला. दुसरीकडे या घराकडे सत्ता होती तेव्हा ते काही करू शकले नाहीत आता ते काय करतील? गेल्या दहा वर्षांत महायुतीच्या सरकारच्या काळात गावोगावी रस्ते झाले, शेतकऱ्यांना पाणी मिळाले, हजारो घरकुल, शौचालय मिळाले, पाणीपुरवठा योजना मिळाली.
शेतकऱ्यांना सिंचन, दिवसा विज, पाणंद रस्ते निर्माण करणे हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे. सम्राट चक्रवर्ती राजा भोजांचे नाव कारंजा शासकीय आयटीआयला देऊन भोयर पवार समाजाचा सन्मान केला. तेली समाजाचे आराध्य संताजी जगनाडे महाराजांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. त्यामुळे तेली समाजाच्या विद्यार्थींना स्कॉलरशिप मिळणार. भोयर पवार समाजाला नौकरीत ओपन कॅटेगरी मध्ये गणल्या जात होते. आता त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळणार आहे. जे काम 60 - 70 वर्षांत झाले नाही ती कामे करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने लोकशाही आली. राज्याच्या पोटी राजा जन्माला यावा म्हणून संविधान लिहले नाही तर सामान्य जनतेतून नेतृत्व उभे राहिले पाहिजे यासाठी संविधान लिहले आहे. घराणेशाही म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे संविधान व लोकशाही आपल्याला वाचवायची आहे. आम्ही सामान्य कुटुंबातून आलो आहोत. विरोधकांसारखे राजकीय घराण्यातील वारसा घेऊन नाही आलो. आर्वी विधानसभेचा होत असलेला विकास विरोधकांना खुपत आहे. देवेंद्रजी व नितीनजींनी केलेल्या विकासामुळे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने हे त्यांचावर टिका करतात असे वानखेडे म्हणाले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासह महीला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.