मतदारराजाला हवा नवा चेहरा । अनुभवी आणि दूरदृष्टी असलेला तरुण तडफदार सुमित वानखेडे
आर्वी विधानसभेत सुमित दादांचीच सरशी
लक्षवेधी लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
आर्वी : विधानसभेत खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडे असा सामना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विधानसभा निवडणुकीत आर्वीची जागा काँग्रेसला सुटणार, असा अंदाज असताना ती राष्ट्रवादीकडे गेली, येथून राष्ट्रवादीने खासदारांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लढतीला पवार विरुद्ध फडणवीस अशी किनार आहे. परिणामी दोन्ही उमेदवारांसाठी ती अस्तित्वाची लढाई समजली जाते.
काँग्रेसचा हा गड राखणारे काळे कुटुंब लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेले आणि या निवडणुकीत भाजपशी दोन हात करीत अमर काळे विजयी झाले. विधानसभेत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि येथून मयुरा काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा ‘पंजा’ गायब झाला आहे. खासदार काळे यांनी पत्नीसाठी उमेदवारी आणल्याने आघाडीत नाराजीचा सूर आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षाचे नेते तसेच जनसाम्यातून नाराजीचा सुरु मतदार संघात उमटू लागला आहे. त्यामुळे आर्वी मतदार संघात सुमित वानखेडे यांचा विजय निश्चित मनाला जात आहे.
कृषीप्रधान टीव्हीच्या वतीने घेण्यात आला पोल
आर्वी विधानसभेत कृषिप्रधान टीव्हीच्या वतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये जवळपास १६००+ मतदारांनी सहभाग घेतला .
त्यामधून सुमारे ५२ % लोकांची सुमित वानखेडे यांना पसंती आहे तर ३७% लोंकाची मयुरा काळे यांना तर १० % लोंकानी प्रहार चे जयकुमार बेलखेडे यांना पसंती दर्शविली.
निवडणुकीतील निर्णायक मुद्दे :
● उद्याोग नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सुशक्षित युवा मतदार त्रस्त आहेत.
● पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपचे वर्चस्व आहे. मतदारसंघातील तीनही तालुक्यात आघाडी विरुद्ध युती असाच संघर्ष आहे. पण सत्तेच्या प्रभावातून परिसराचा कायापालट करता येऊ शकतो, हे वानखेडे यांनी दाखवून दिल्याने ते युवा, शेतकरी व छोट्या समाज घटकास आकर्षित करणारे ठरले आहे.
● आर्वी विधानसभेत नवीन आश्वासक चेहऱ्याची पसंती मतदारांनी दाखवली त्यामुळे घराणे शाही हा मुद्धा सुद्धा निवडणुकीत गाजत आहे.
● अनुभवी आणि दूरदृष्टी असलेला तरुण तडफदार म्हणून सुमित वानखेडे यांनी तरुणांवर वेगळी छाप निर्माण केली.