आमदार सुमित वानखेडेंच्या हस्ते अग्नीशमन वाहनाचे लोकार्पण संपन्न

 आमदार सुमित वानखेडेंच्या हस्ते अग्नीशमन वाहनाचे लोकार्पण संपन्न

"आर्वीकरांच्या मागणीनुसार 90 लाख रुपयांची तरतूद वाहन खरेदीवर केली होती" - आमदार सुमित वानखेडे 

आमदार सुमित वानखेडेंच्या हस्ते अग्नीशमन वाहनाचे लोकार्पण संपन्न

 प्रतिनिधी : धिरज मानमोडे 

आर्वी : नगरपरिषदेला असलेले अग्निशमन वाहन जुने झाल्याने आपात्कालीन स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहन नादुरुस्त असल्यास कर्मचाऱ्यांना फारच त्रासदायक ठरत होते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आर्वीकर व परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हि बाब आर्वी नगरपरिषदचे माजी सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आमदार सुमित वानखेडे यांना सांगितले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुमित वानखेडे यांनी आर्वी नगरपरिषदला नव्याने अग्नीशमन वाहन खरेदी करीता 90,00,000 रूपये निधी मंजूर करून दिला होता. त्याच निधीतून नव्याने आर्वी नगरपरिषदच्या ताफ्यात नविन अग्नीशमन वाहन तथा फर्स्ट रिस्पॉन्डट दोन बाईक खरेदी करण्यात आल्या व त्या दोन्ही वाहनाचे लोकार्पण आमदार सुमित वानखेडेंच्या हस्ते करण्यात आले.

आमदार झाल्यानंतर प्रथमच सुमित वानखेडे यांनी मंजूर केलेल्या निधीतून अग्नीशमन वाहनाचे लोकार्पण त्यांच्याच हाताने झाले. आता आर्वी तालुक्यातील ग्रामीण व आर्वी शहर येथील  भागात कुठेही आग लागली असता आग नियंत्रणात आणण्यासाठी आर्वी नगरपरिषदचे अग्नीशमन वाहन सदैव उपलब्ध होईल. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन करणे सोपे होईल.

या लोकार्पण सोहळ्याला डॉ. किरण सुकलवाड मुख्याधिकारी न. प. आर्वी, अनिल जोशी, राजाभाऊ गिरीधर, संजय राऊत, प्रशांत ठाकूर, प्रशांत सव्वालाखे, संजय थोरात, अब्दुल कय्युम भाई, उषाताई सोनटक्के, भारतीताई देशमुख, शुभांगी पुरोहित, विजय बाजपैयी, सुनिल बाजपैयी,प्रकाश गुल्हाने, अजय कटकमवार, पप्पू जोशी, मनोज कसर, प्रकाश सातरोटे, राजेश वानखेडे, अबु हसन, राहुल गोडबोले, मिथुन बारबैले, नितीन मेश्राम, रवी गाडगे यांच्यासह अनेक महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

MLA SUMIT WANKHEDE


Previous Post Next Post