बहुजन महापार्टीने दिला यशोमतीं ठाकूर यांना पाठिंबा
तिवसा विधानसभा मतदारसंघाचे चित्र पलटणार
उमेदवार हर्षवर्धन खोब्रागडे यांचा बिनशर्त पाठिंबा
अमरावती -
बहुजन महापार्टीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे यांनी तिवसा विधानसभा निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंबामुळे तिवसा विधानसभा निवडणुकीचे चित्र पलटणार असून यशोमती ठाकूर आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात नुकतेच बहुजन महापार्टीचे उमेदवार खोब्रागडे यांनी पाठिंबा पत्र काढून महायुतीवर घनाघाती टीका केली आहे. राज्यातील महायुती आणि देशातील केंद्र सरकार यांची ध्येयधोरणे ही शेतकरी कष्टकरी शेतमजूर बहुजनांच्या व स्त्रियांच्या अत्याचारांच्या समस्यांबाबत गंभीर नसून दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत आहे.जातीपातीचे धर्माचे राजकारण करून शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे भ्रष्ट महायुती सरकार करत आहे. विविध वाढती महागाई वाढती बेरोगारी वाढल्या शेतकरी समस्या वाढत्या शेतकरी आत्महत्या समाजातील युवकांना व युवतींना मिळत नसलेले रोजगार हे भाजपचे पाप असून तिवसा मतदार संघातील भाजपचे उमेदवार व त्यांचे समर्थक बटोंगे तो कटोंगे ही भाषा वापरत आहेत व ते कंत्राटदार आहेत.
जनतेचे,जनसामान्यांचे बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या सारखे नेतृत्व खऱ्या अर्थाने गरजेचे आहे ज्यांनी सर्व समाज घटकांना आजवर आमदार म्हणून न्याय दिला. भाजप धर्मांध शक्ती वापरत बहुजनांमध्ये फूट पाडून या ठिकाणी सत्तेवर येण्याच्या अयशस्वी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार यशोमतीताई यांचे मताधिक्य कमी होऊ नये त्याचप्रमाणे खन्या अर्थाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची गरज असल्याने मी माझी उमेदवारी कुठल्याही दबावात न येता मागे घेऊन आमदार यशोमती ताई ठाकूर यांना विनशर्त पाठिंबा देत आहे. असे खोब्रागडे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
यशोमती ठाकूर यांना सर्व समावेशक पाठिंबा मिळत असल्याने त्या प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे.