"गरीबीची जाण नसणाऱ्यांना लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैश्याची किंमत काय कळणार" - सुधीर दिवे 🚩
"सुमितनी एखाद्या विषयात हात घातला की तो विषय मार्गी लागतोच" - अनिल बोंडे 🚩
"25 लाखाचा विम्याची घोषणा म्हणजे डॉक्टर व विरोधकांची रोजगार हमी योजनाच" - सुमित वानखेडे 🚩
"सुमित वानखेडे रयतेचे आरोग्यसेवक" - रोमी भिंडर
प्रचार सभेत बोलताना सुधीर दिवे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. त्यामधील 65 वर्ष काँग्रेसने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आणि 65 पैकी 40 वर्ष केवळ एका घराची सत्ता होती. तरीही आर्वीचा विकास झाला नाही. मग पुन्हा 40 वर्षानंतर त्याच घराण्यामध्ये आमदारकी चा अट्टाहास का? लाडक्या बहिणींना महिण्या काठी 1500 रुपये मिळतात म्हणून विरोधकांना पोटदुखी होते. आपल्याला सोयाबीन एकरी 5 पोतेही होत नाही आणि आज प्रचाराला आलेल्या सुप्रियाताईंना एका एकरात दोन कोटीची वांगे कशी काय आली? हे कसं शक्य आहे? गरीबीची जान नसणारे लाडकी बहीणींना मिळणाऱ्या पैशाची किंमत काय कळणार. 40 वर्षात बेरोजगारांची फोज तयार केली आणि आता बेरोजगारीच्या नावे बोंबा मारत फिरत आहे. उद्योग न आणून विधानसभेत बेरोजगारी हे यांचेच पाप आहे असा घणाघात दिवेंनी केला.
सुमित वानखेडे यांनी तळेगाव सभास्थळी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, जमलेली गर्दी पाहता सर्व समाजाने ठरवलं आहे की कमळाची तिसऱ्या नंबरची बटण दाबून भारतीय जनता पार्टीचा आमदार बनवणारच. खासदारकी असुनही मतदारसंघासाठी काही केले नाही आणि पत्नीच्या प्रचारासाठी वनवन फिरत आहेत. यांनी भुतकाळात काय केले सांगायला काही नाही अन् भविष्यात काय करणार हेही सांगायला काही नाही असा टोला त्यांनी लगावला. माझ्या जाहीरनाम्यात नमुद एक अन् एक विकास कामे केलेली आहे तेही फक्त सहा महिन्यात! पाच वर्षाचा कालावधी मला मिळाला तर आर्वी विधानसभेचे विकास कामांचे पुस्तक बनेल. ज्याला जे जमते ते करू दिले पाहिजे घरातच पदाचा अट्टाहास का? 'लाडकी बहीण' योजना बंद व्हावी म्हणून जंग जंग पछाडले, कोर्टात गेले लाडक्या बहिणींना पैसे मिळतात म्हणून यांची पोटदुखी आहे. महीलांचा एसटी बस मध्ये अर्धी तिकीट केले तेंव्हाही विरोधकांनी महामंडळ घाट्यात येण्याची बोंब मारली होती. पण झाले उलटे लाडक्या बहीणींनी घाट्यात असलेले एसटी महामंडळ फायद्यात आणू दाखवले. यांची 25 लाखाची विमा योजना म्हणजे अर्धे डॉक्टर आणि अर्धे हे असाच विषय आहे. कारण मोदीजींनी आधीच 5 लाखाचा उपचार मोफत केला आहे. ही कसली यांची पंचसूत्री आहे. खासदार बनून सहा महिने झाले तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे आपली लढाई शाश्वत विकासासाठी आहे असं वानखेडेंनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाला तळेगाव व परीसरातील पंचक्रोशीतील पुरूष आणि महीलांची तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.