महायुतीचे बंड झालेत थंड, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी कायमच
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांचे आज चित्र स्पष्ट झाले आहे. चारही विधानसभा मतदार संघातून एकूण ७२ नामांकन प्राप्त झाले होते. आज त्यातील १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ६० उमेदवार रिंगणात कायम आहे. आर्वी विधानसभा मतदार संघात १८, देवळीत १४, हिंगणघाटात १२ तर वर्धा विधानसभा क्षेत्रात १६ उमेदवार रिंगणात आहेत. एका बॅलेटवर १५ उमेदवार आणि नोटा अशी १६ नावे असतात. परंतु आर्वी आणि वर्धा विधानसभा मतदार संघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन बॅलेट युनिटची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच दिव्यांग व ८५ वर्षांवरील वृद्ध मतदारांना गृह-मतदानाची सोया करण्यात येणार असून ८ ते १० नोव्हेंबर रोजी हि प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी धडपड
चारही विधानसभा मतदार संघात उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून आता लढत कशी राहणार आहे, याचा अंदाज उमेदवारांना आला आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. प्रत्येक गावागावात पोहोच- ण्यासाठी धडपड आधीच सुरु झाली असून आता प्रचार दौरे, प्रचार सभा, मेळावे यावर भर दिला जाणार आहे. याकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहे.