गुरुकुंज यात्रा महोत्सवात यशोमती ठाकूर यांचा फुगडीच्या तालावर ठेका
शोभायात्रेत सहभागी दिंड्यांचे केले आत्मीय स्वागत
अमरावती- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५६वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा झाला. या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांचे आमदार यशोमती ठाकूर यांनी आत्मीय स्वागत करून सत्कार केला. दरम्यान यशोमती ठाकूर यांनी पालखी पदयात्रेकरूंसोबत फुगडीच्या तालावर ठेका धरत सगळ्यांचा उत्साह वाढवला.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता हि सकल जगासाठी आदर्श असून तिच्या अनुसरणाने जगात एकोपा व शांतता नांदेल असा विश्वासही यावेळी यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. दरवर्षीनुसार यावर्षीही देश-विदेशातील असंख्य गुरुदेव अनुयायी व विविध दिंड्या या सोहळ्याचा एक भाग होता.