आर्वीच्या राजकारणात नवा ट्विस्ट । उमेदवारी जाहीर न होतास 'पक्षातर्फे' अर्ज भरणार

आर्वीच्या राजकारणात नवा ट्विस्ट । उमेदवारी जाहीर न होतास 'भाजपतर्फे' अर्ज भरणार

आर्वी विधानसभा उमेदवारी बाबत दोन्ही प्रमुख युती व आघाडी चा गुंता अजून सुटलेला नसतांना भाजपाच्या विद्यमान आमदारांनी आपली उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पण जाहीर केला आहे.

Arvi Vidhansabha BJP Candidte Nomination

आर्वी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने  गुंता असलेल्या काही जागा अद्याप जाहीर केल्या नाही, परंतु आर्वी  मध्ये विद्यमान आमदार व इच्छुक उमेदवाराने आपली उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पण जाहीर केला आहे. आर्वी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे नाव पक्षाने जाहीर केले नाही. पण आज त्यांच्या नावाचा मेसेज सोशल मीडियावर फिरला. केचे हे २८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार. पक्षाच्या ए बी फॉर्मवर. यावर विचारणा केल्यावर दादाराव केचे म्हणाले की, हो मी या दिवशी अर्ज दाखल करीत आहे. उदया तसे येईलच. केचे यांचा हा आत्मविश्वास भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे. 

दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू दिवस रात्र एक करत मतदार संघ पिंजून काढून मतदारांच्या दारावर पोहचत आहे, त्यांचा कडून जनसंवाद यात्रा देखील सुरु झाल्याचे चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे. 

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू अशी केवळ भाजप मध्येच नव्हे तर सर्वत्र ओळख दिल्या जात असलेले वानखेडे यांच्या उमेदवारीचे मग काय? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. वानखेडे हेच आर्वीचे उमेदवार राहणार, असे त्यांच्या कार्याचा झपाटा व आणलेला हजारो कोटी रुपयाचा निधी यामुळे उघड म्हटल्या जाते. एक युवा तरुण, अभ्यासू व  सुसंस्कृत व्यक्ती अशी ओळख देत आर्वी शहरात त्यांनी सर्व सामान्य जनतेत क्रेझ निर्माण केली आहे. पण त्या लाटेवर मात करीत केचे आज स्वतः उमेदवारी जाहिर करून बसले आहे. त्यामुळे फडणवीस केचे यांच्या दबावतंत्रास झुकले काय, अशीही आज चर्चा होत आहे.


मुंबईत  'सागर' वर नेमके काय घडले ? 

दोन दिवसापूर्वी केचे यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रस्तावित कार्यकर्ता मेळावा रद्द केला. सकारात्मक चर्चा झाल्याने मेळावा रद्द करण्यात आल्याचे कारण त्यांनी खुल्या मेसेज मधून पाठविले होते. आता त्यांनी थेट अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर करीत मी सांगतो तसेच होणार असा संदेश दिला आहे. कारण एक महिन्यापासून त्यांनी मी १०० टक्के उमेदवार राहणार अशी खात्री देणे सूरू केले होते. आता पक्षाच्या अधिकृत यादीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post