रिपाई (आंबेडकर )पक्षाचा बळवंत वानखडे यांना बिनशर्त पाठिंबा
मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे दिले आश्वासन
अमरावती: महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांना रिपाई (आंबेडकर) पक्षाचा बिनशर्त पाठिंबा जाहीर करून पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या आश्वासन दिले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर )पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अमरावती लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंतभाऊ वानखडे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याकरिता या बैठकीत निर्णय घेण्यात आला.राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी बळवंत वानखेडे यांना आशीर्वाद दिला. त्यानुसार आज एड. यशोमती ताई ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन बळवंत वानखडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह बळवंत भाऊ वानखडे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्रजी नितनवरे ,जिल्हाध्यक्ष कैलाश मोरे ,कार्याध्यक्ष किशोर सरदार, प्रेम नितनवरे, प्रा. प्रदीप दंदे, देवेश ब्राह्मणे, महेंद्र भालेकर,राजकुमार वरघट ,धनराज वानखडे,देवानंद इंगळे, बंडू चोरपगार, नामदेवराव वासनिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बळवंत भाऊ वानखडे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा संकल्प केला आणि सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सांगण्यात आले. उद्यापासून सर्व कामाला लागतील असे आश्वासन दिले.
बळवंत वानखडे हे हे एकनिष्ठ व प्रामाणिक उमेदवार म्हणून सर्व परिचित आहे त्यांना निवडून आणण्यासाठी आता तळागाळातील कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचेही पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेत असल्याने वानखडे यांची उमेदवारी भक्कम झाली आहे.
कोणत्याही प्रकारचा कलंक नसलेला प्रामाणिक उमेदवार महाविकास आघाडीच्या रूपाने अमरावती लोकसभेसाठी लाभल्याने आता विविध संघटना व पक्षांचे पदाधिकारी बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.