पशु पालक बांधवाना पशु आरोग्य व रोग निदान यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन
सध्या चंद्रपूर जिल्यातील पावसाला सुरवात झाली आहे तसेच चंद्रपूर जिल्यात पशु पालक बांधवाना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जनावरांच्या आरोग्य विषयक अनेक समस्या उद्भवतात त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजक करोंना आजाराच्या पऱ्शोभूमीवर चंद्रपूर जिल्यामध्ये लॉकडाऊन असल्या मुळे पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी अमित मेश्राम यांनी रेलीयन्स फाऊंडेशन माहिती सेवा चंद्रपूर आणि पशु संवर्धन विभाग सिंदेवाही यांचा संयुक्त विध्यमानाने दि. २६/०६/२०२० ला चंद्रपूर जिल्यातील पशु पालकांसाठी पशु आरोग्य व रोग निदान कार्यक्रमाचे आयोजन डायल आउट कॉन्फरन्स च्या माध्यमातून केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. अविनाश सोमनाथे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जी. प. चंद्रपूर यांनी पशुपालकांना लंपी स्कीन डिसीज हा आजार काय आहे, हा आजार कशा मुळे होतो व या आजाराची लक्षणे व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. .
डॉ. सतीश अघडते , पशुधन विकास अधिकारी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी पशुपालकांसाठी असलेल्या शाशणच्या विविध योजना कोणत्या आहे व त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो याबद्धल सविस्तर मार्गदर्शन कले. तसेच गाई आणि म्हशी यांच्या दूध उत्पादनात वाडी करीता उपाय योजना वर मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनि पावसाळ्यात जनांवराचे व्यवस्थापन कसे करावे यावर सुद्धा संविस्तर मार्गदर्शन केले.तसेच जनावरांच्या (गायी, म्हशी, बकरी, कुकुट पालन) यांना उद्भवणाऱ्या विविध आरोग्य विषयक समस्या व रोग निदान या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गोठ्याचे व जनावरांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले.
डॉ. संतोष गवाहरे पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही यांनी लसीकरण कधी करायचे त्याचे फायदे, पोक्षक आहार आपण कशा पद्धतीने जनावरांना देऊ शकतो व तो कसा घरच्या घरी तयार करता येतो यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील , ६ तालुक्यातील 17 गावामधले ३१ पशुपालकांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत पशुपालकांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व पशुपालकांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.