वर्धा : वर्धमनेरी व सिंधी मध्ये ५ कोरोना बाधित रुग्ण
वर्धा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा आकडा वाढला असून यामध्ये आर्वी तालुक्यातील २ तर सिंदी रेल्वे मधील तिघांचा समावेश आहे.
आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे ५२ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली होती त्यामुळे संपर्कातील संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन केले होते आज त्या पुरुषाची पत्नी वय ४५ वर्ष व मुलगी २१ वर्ष यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने आर्वी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
[ads id="ads1"]
तर जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील रेल्वे कर्मचारी काही दिवसा आधी कोरोना बाधित आढल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांना सुद्धा क्वारंटाईन केले होते आज त्यांच्या संपर्कातील ३ लोकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये एक वर्धा येथील रहिवाशी असून २ नागपूर येथील असल्याची माहिती आहे.