शाळा होणार सुरु ! शालेय शिक्षण विभागाची नियमावली जाहीर
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर करून प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग प्रत्यक्षात जुलै महिन्यापासून सुरु करणार आहे.
राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दररोज नवीन रुग्ण आढळत आहे, त्यामुळे शाळा सुरु करण्याला तीव्र विरोध होत होता. त्यामुळे शाळा १५ जून पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या जाणार असून प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने जरी केले आहे.
[ads id="ads1"]
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग प्रत्यक्षात जुलै महिन्यापासून सुरु करणार आहे तर सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग ऑगस्ट पासून भरवले जाणार आहे. आणि दहावीच्या निकालानंतर अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्यण घेतला जाणार आहे.
असे भरणार प्रत्यक्षात शाळा :
- जुलै : नववी , दहावी, बारावी
- आगस्ट : सहावी ते आठवी पर्यंत
- सप्टेंबर : पहिली ते पाचवी
- अकरावी - दहावीच्या निकालावर आधारीत
- पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नाही
- डिजिटल शिक्षण मर्यादा १ ते २ तास
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निर्णयात पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ओनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करून नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना कमाल १ तास, सहावी ते आठवी साठी कमाल २ तास, व नववी ते बारावीसाठी ३ तास प्रतिदिन ऑनलाईन वर्ग घ्यावे व डिजिटल अध्ययनात आवश्यकतेनुसार ब्रेक घ्यावा असही नऊ नमूद करण्यात आले आहे.