कार्यसम्राज्ञी -विश्लेषण-
यशोमती ठाकूर, विदर्भातील एकमेव महिला आमदार, महिलांना त्यांच्या बद्दल विशेष अभिमान, सर्व महिलांशी संवाद नसला तरी विदर्भातील एकमेव महिला आमदार म्हटलं तर स्त्री शक्ती ला अभिमान राहणारच, त्यात आक्रमक, अभ्यासू, व जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी असलेली तत्परता त्यांचे वेगळेपण अबाधित करते. २००४ पासून सक्रिय राजकरणात समाजकारण करत गावोगावी केवळ पक्षाचीच नव्हे तर राखी पाठवून नेता व कार्यकर्ता यातील नाते भावा-बहिणीचे ठेवत आपसूकच युवा वर्ग मोठ्या जिव्हाळ्याने ताई म्हणतात.
तेच आबालवृद्ध यशोमती आली काय गावात कसं काय येणं केलं बाई अस म्हणत ताईना गोंजरतात हो गोंजरणारी म्हातारी मंडळी पक्षाचीच असते अस नाही पण हे ऋणानुबंध राजकीय वारसा व स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांनी बांधलेली ही मोट यशोमती ठाकूर कायम वाहत आहेत.
स्वर्गीय इंदिराजी गांधी , स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या कार्याचा आदर्श ठेवत त्या पक्षबांधनी साठी सतत झटत असतात, मग ती मतदारसंघातील बूथ कमिटी असो की तालुक्यातील शाखा, हाच जिव्हाळा राष्ट्रीय सचिव म्हणून धुरा सांभाळताना त्या मेघालय व कर्नाटक राज्यात सुद्धा त्या जपतात, व काम करतात.
आणि म्हणूनच त्यांची दखल पक्षश्रेष्ठीं घेतात, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असोत, की आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅम पित्रोदा असो, की गुलाम नबी आझाद असो की मल्लिकार्जुन खरगे त्यांना यशू म्हणून त्यांच्या मेहनतीला चर्चेतून व मार्गदर्शमातून दाद देतात.
विकासाचा आलेख वाढताच ठेवत शेतकरी प्रश्नांवर त्या या चार वर्षात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून सक्रिय आंदोलन करत आक्रमक आंदोलनाची त्यांनी तर अर्धशतकच पार केले.
हेच शेतकऱ्यांचे प्रश्न मुंबईतही विधानसभेत त्या मांडत आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या राष्ट्रीय सचिव व आमदार म्हणून त्या मतदारसंघ , राज्याचे प्रश्न म्हणून मुंबई- विधानसभा- मंत्रालय- व काँग्रेस पक्षाचे काम राष्ट्रीय स्तरावर करता करता एक जबाबदार आई व गृहिणी म्हणून त्या अशा अनेक बहुआयामी तऱ्हेने काम करत आहेत.
देशात वाढलेली अराजकता , संविधान विरोधी कार्य करणाऱ्या संघटना, जातीय तणाव वाढविण्यासाठी जबाबदार असलेले घटक यावर त्या नेहमीच आपल्या खुमासदार शैलीत भाषणात समाचार घेतात व त्यामागील कटकारस्थान जनतेसमोर मांडतात.
राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, संविधान संरक्षण च देश टिकवू शकते याबद्दल त्या आग्रही व कटिबद्ध आहेत.
मतदारसंघातील ४ तालुके, दिल्ली, मुंबई-विधानसभा , कर्नाटक , मेघालय, राज्य प्रभार, यवतमाळ व जळगाव जिल्ह्याची पक्ष संघटनेची धुरा त्या विदर्भातील एकमेव महिला आमदार असून सुद्धा जातीने पार पाडतात. नुकतेच मतदारसंघात झालेले विकासकामाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर एका अन्य पक्षाच्या नेत्याने त्यांचा उल्लेख कार्यसम्राट म्हणून केला, हा उल्लेख कानी पडताच खाली बसलेले एक माजी आमदार ज्यांनी यशोमती ठाकूर यांना २००४ च्या निवडणूकित हरवले होते व २०१४ च्या निवडणूकित यशोमती यांनी त्यांना हरवले होते अशा जेष्ठ नेत्याने कार्यसम्राट शब्द ऐकताच याऐवजी यशोमती यांना कार्यसम्राज्ञी असा केला पाहिजे असे ते खाजगीत आजूबाजूच्या मंडळीना बोलून गेले आणि हीच यशोमतीताई यांच्या कामाची ,सेवेची पावती होय व जनताजनार्दनाचा आशीर्वाद होय. आज त्या पालकमंत्री म्हणून व महीला व बालकल्याण मंत्री म्हणून सुद्धा कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत, कोरोना बाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री म्ह्णून आवश्यक ती दक्षता त्या घेत आहे वाढदिवस निमित्त या कर्मास व सेवेस मनःपुर्वक हार्दिक यशोमय शुभेच्छा.
तिवसा.