धक्कादायक : वर्ध्यात कोरोनाची लागण, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी: मयूर वानखडे :
वर्धा : जिल्हा आजपर्यंत एकही कोरोनो रुग्ण नसल्याने ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आला होता, परंतु आज सकाळी प्राप्त अहवाल नुसार एका महिलेच्या मृत्यू नंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, सदर महिला आर्वी तालुक्यातील असून या महिलेला दम्याच्या बिमारी साठी वर्धा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याआधी सदर महिलेचे स्वाब थ्रोट चाचणी करीता घेण्यात आले होते आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
वर्धेत आढळला वाशिम जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण
वर्धा मधील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात एक करोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा रूग्ण उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून शनिवारी दाखल झाला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर तो करोनाग्रस्त असल्याचे रात्री स्पष्ट झाले. कोविड रूग्णालय म्हणून मान्यता असलेल्या सेवाग्रामच्या रूग्णालयात त्याला आता दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
वर्धा जिल्हा आधीपासूनच ग्रीन झोन मध्ये असल्यनाने त्याच अनुशंगाने जिल्ह्यात काही व्यवसायांना सूट देण्यात आली होती. परंतु आता कोरोना बाधित रुग्ण आढल्याने प्रशासन काय निर्णय घेते हे महत्वाचे आहे.