वर्ध्यात पुन्हा ३ कोरोना पॉजिटीव्ह
प्रतिनिधी मयूर वानखडे :
वर्धा । जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण संख्या वाढतच आहे, अश्यातच सोमवारी रात्री ३ रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे..
हिंगणघाट तालुक्यातील २ व्यक्ती तर सावंगी येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शिरुड येथील दोघे पती पत्नी दाम्पत्य पुणे येथून आले असल्यासची हिस्ट्री आहे त्यांना अधिच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे स्वाब घेण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले. त्यांचे वय ३७ व ३२ वर्ष आहे.
तर सावंगी येथी २८ वर्षीय युवती मुंबई येथून आल्याची हिस्ट्री असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉजिटीव्ह संख्या १६ वर जाऊन पोहचली आहे.