वर्धा । कोरोना रुग्ण संख्या पोहचली १० वर

वर्धा । कोरोना रुग्ण संख्या पोहचली १० वर


वर्धा । कोरोना रुग्ण संख्या पोहचली १० वर 

वर्धा : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढतच आहे यात जास्त बाहेर जिल्ह्यातील लोकांनाच समावेश असला तर उपचार मात्र वर्धा येथे सुरु आहे. 

आज आलेल्या चाचणी अहवाल नुसार अमरावती जिल्ह्यातील धामणगांव येथील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३ व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे, त्यामुळे वर्धा येथील रुग्ण संख्या १० वर जाऊन पोहचली आहे. 

त्याच प्रमाणे हिवरा तांडा येथील मृत महिलेच्या संपर्कातील २८ व्यक्तींचे दुसरे चाचणी अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले आहे, तर मुंबई येथून जामखुटा येथे आलेल्या ३ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील ४ व्यक्तीचे चाचणी निगेटिव्ह आली असून २ व्यक्तींचे नमुने पुन्हा तपासणी साठी पाठविण्यात येणार आहे. 

वर्धा जिल्ह्यात नोंद झालेल्या १० रुग्णा पैकी एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ९ रुग्णवर उपचार सुरु आहे.  
Previous Post Next Post