मानसिक दडपणामध्ये दिलेली परीक्षा ही परीक्षा ठरणार नाही?-सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई
परीक्षा घ्यायची म्हटल्यास विद्यापीठासाठी ती तारेवरची कसरत ठरेल
परिक्षेबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी
चालू सत्रासाठी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा
विद्यार्थ्यांच्या मागील प्रगती अहवालावरून त्यांचा निकाल निश्चित करावा
अमरावती - संपूर्ण जगामध्ये या मालिकेच्या माध्यमातून विश्वामध्ये हाहाकार माजला आहे अशा संकटाचा सामना समाजातील सर्व घटक करीत आहे परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये यासंदर्भात विशेष संभ्रम निर्माण झाला असून विद्यार्थी वर्ग आपल्या परीक्षा व निकालाबाबत संभ्रमित आहे. लॉकडाउनमुळे विद्यार्थी घरामध्ये बसून असून, परीक्षा आणि करियरच्या चिंतेमुळे ग्रस्त आहेत.त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी व विद्यार्थ्यांच्या मागील प्रगती अहवालावरून त्यांचा निकाल निश्चित करावा अशी मागणी राज्यपाल नामीत सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी केली आहे
यासंदर्भात सध्या राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा बाबत दोन दिवसात निर्णय होणार आहे. दरम्यान याबाबत UGC च्या गाइडलाइन्स प्राप्त झाल्या असून शिवाय विद्यापीठाने आपल्या स्तरावर परीक्षांचे नियोजन करावे या मताचे UGC आहे. परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा भौगोलिक इतिहास, सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता येथील विद्यार्थी हा परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज नाही. कारण सध्याच्या स्थितीमुळे विद्यार्थी वर्गा च्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा वातावरणात परीक्षा घेणे योग्य आहे का असे मत शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सरसकट अमरावती विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गांमध्ये प्रवेश देऊन विद्यार्थ्यांच्या मागील प्रगती अहवालावरून त्यांचा निकाल निश्चित करावा यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती,प्रात्यक्षिक कार्य व त्याने प्रत्यक्षपणे शैक्षणिक सत्रामध्ये दिलेला सहभाग या सर्वांच्या निकषांवरून त्याचा निकाल ठरविण्यात यावा व त्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित करावे त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देता येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी.
एम.फिल व पी.एचडी चा मौखिकी (viva) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात यावी.राज्यातील करोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन यावर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळेल. लॉक डाऊन बाबत संभ्रम स्थिती त्यामुळे निर्णय घेताना विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावे व समाजातील स्थितीचा सर्व अंगांनी विचार करावा. जर परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून परीक्षा घ्यायची म्हटल्यास विद्यापीठासाठी ती तारेवरची कसरत ठरेल आणि विद्यार्थीवर्ग भितीदायक स्थितीमध्ये परीक्षा देईल त्यामुळे मानसिक दडपणामध्ये दिलेली परीक्षा ही परीक्षा ठरणार नाही? असा सवाल देखील शिक्षण क्षेत्रातून विचारला जात आहे.
अमरावती विद्यापीठाच्या भौगोलिक परिक्षेत्राचा अभ्यास करणे गरजेचे असून मुंबई-पुण्यासारख्या विद्यापीठाची स्थिती अमरावती विद्यापीठाची नाही हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. परीक्षा घेण्यासाठी सुरक्षित जागा, पुरेसे मनुष्यबळ आणि वेळेचे नियोजन, सोशल डिस्टन्सचे पालन, परीक्षा केंद्रावरील प्राध्यापकांची सुरक्षा, इंटरनेटची सुविधा, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र पर्यंत जाण्यासाठी दळणवळण साधन, फिजिकल डिस्टन्स ठेवून परीक्षा घेतल्यास त्यामधून निर्माण होणारा संसर्ग या सर्वांबाबत गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी
अशी मागणी राज्यपाल नामीत सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रत्यक्ष राज्याचे उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे अमरावती विद्यापीठ याबाबत निर्णय घेताना वरील बाबींचा सर्वंकष विचार करण्याबाबत सूचना केली आहे तसेच कुलगुरूंना निवेदनाद्वारे कळवले आहे.