अड्कलेल्या प्रवाश्यांना ST पोहचविणार मोफत गावी
काही अटी शर्थी च्या आधारावर महामंडळाचा मोठा निर्णय
पॉईंट तो पॉईंट होणार प्रवास मधात कुठेही बस थांबणार नाही.
लोकडाऊन च्या काळात काही नागरिक वेगवेळग्या ठिकाणी अडकले आहेत त्यांना आता त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता काही अटी शर्थी च्या आधारवर मोठा निर्णय घेतला आहे .
यामध्ये अडकलेल्या नागरिकांना विनातिकीट म्हणजेच मोफत गावी पोहचविणार आहे, एका ST बस मध्ये २२ लोकांनां प्रवेश असेल आणि एका सीट वर एकच प्रवासी बसू शकेल, तर हि बस मधात कुठेही थांबणार नाही. सोबतच प्रवाशांना आगारातील प्रसाधन गृहाचा वापर करावा लागेल आणि लांबच्या प्रवाश्यांनि जेवणाची व्यवस्था डबा सोबत घ्यावा लागणार आहे.
कंटेन्टमेंट झोन वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी, मजूर, बाहेरगावी गेलेले नागरिक यांनी त्यांच्या गावी मोफत पोहचविण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे. सदर निर्णयाने इतरत्र अडकलेल्या लोकांना आपल्या स्वगृही जाण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.