पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन
रिलायन्स फाउंडेशन चंद्रपूर यांचा उपक्रम
रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा चंद्रपूर व पशुसंवर्धन विभाग सिंदेवाहि तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर , यांच्या संयुक्त विद्यमाने ता.सिंदेवाहि चंद्रपूर पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने दि.14/05/२०२० ला मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक करोंना आजाराच्या पऱ्शोभूमीवर चंद्रपूर जिल्यामध्ये लॉकडाऊन असल्या मुळे पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी अमित मेश्राम यांनी केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. संतोष गवारे , पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही यांनी पशुपालकांना लंपी स्कीन डिसीज हा आजार काय आहे, हा आजार कशा मुळे होतो व या आजाराची लक्षणे व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. शिवाय लसीकरण कधी करायचे त्याचे फायदे, पोक्षक आहार आपण कशा पद्धतीने जनावरांना देऊ शकतो व तो कसा घरच्या घरी तयार करता येतो यावर मार्गदर्शन केले. तसेच शेळी, गाई, म्हशी, बैल यांना होणाऱ्या विविध आजार व उपाय. तसेच गोठ्याचे व जनावरांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले.
त्याचप्रमाणे डॉ. सतीश अघडते , पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही यांनी पशुपालकांसाठी असलेल्या शांशनच्या विविध योजना कोणत्या आहे व त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो याबद्धल सविस्तर मार्गदर्शन कले. तसेच गाई आणि म्हशी यांच्या दूध उत्पादनात वाडीकरीता उपाय योजना वर मार्गदर्शन केले. शिवाय त्यांची उन्हळ्यात जनांवराचे व्यवस्थापन कसे करावे यावर सुद्धा संविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणुन डॉ सारीपुत लांडगे, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, तथा तांत्रिक अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय माफसु, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर , यांनी पशुपालकांना करोंना हा आजार अंडी व चिकन यांचे सेवन केल्यामुळे होत नाही असे सांगितले तसेच शेळी पालन व कुकुट पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यानी जोंडधंदा म्हणुन बघितले पाहिजे , तसेच शेळी व कुकुट पालन यामुळे शेतकऱ्याना किती फायदा होऊ शकतो यांचे आर्थिक समीकरण सुद्धा पटवुन दिले.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील , सिंदेवाही आणि चिमुर येथील ६ गावातील (सावरगांव, खेरि, धानोरा, कलंमगांव, टेकरी, कोठा ) ३१ पशुपालकांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत पशुपालकांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व पशुपालकांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.