चेकपोस्ट वरील पोलीस कर्मचा-यांची प्रा.आ.केंद्र, जळगाव कडुन आरोग्य तपासणी
सध्या राज्यात व देशात कोरोनाने थैमान घातलेले असुन, या पार्श्वभूमीवर सर्वीकडे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणा-या वाहनाचे काटेकोरपणे तपासणी व निर्जंतुकीकरन करण्यात येत आहे. अशावेळी पोलिस विभागातील कर्मचा-यांचा विविध प्रकारच्या लोकांन सोबत संपर्क येत असतो.
हीच बाब लक्षात घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संगिता झोपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केंद्र, जळगाव येथील आरोग्य चमुने आर्वी ते अमरावती मार्गावरील देऊरवाडा चेकपोस्ट वरील पोलिस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी केली. त्यावेळी प्रा.आरोग्य केंद्र जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.कवरासे, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.भगत, आरोग्य सेवक श्री.कांबळे, आरोग्य सेविका श्रीमती.सेलोकार व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.आ.केंद्र, जळगाव अंतर्गत परप्रांतीय १५५ मजुरांची आरोग्य तपासणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्रा मध्ये बाहेरील राज्यातील अडकुन असलेल्या परप्रांतीयांना स्वगावी परतण्याची परवानगी व्यवस्था महाराष्ट्र शासना मार्फत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी होने ही अतिशय आवश्यक बाब असुन, आर्वी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जळगाव अंतर्गत येणा-या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संगिता झोपाटे व वैद्यकीय अधिकारी डाॅ. उषा कवरासे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र वर्धमनेरी येथील ८७, उपकेंद्र नांदपुर येथील ५६ तर निंबोली(पुनर्वसन) येथील १२ अशा १५५ परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी तेथतेथिल समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.जयस्वाल, डाॅ.टाके आरोग्य सेवक श्री.सुनिल डाफ, श्री.अभिजीत ठाकरे श्री.प्रविण पडिशाला यांच्या मार्फत करून परप्रांतीय मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.