'टोळ' धाड किडीचे असे करा नियंत्रण | Locust Control
राज्यात टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान करते. या टोळ किडीचा प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
🔻असे करा नियंत्रण
नुकसान नियंत्रनात आणण्यासाठी टिनाचे डबे, ढोल वाजविणे, टॅक्टर व मोटर सायकलचा सायलेन्सर काढून शेतात मोठ्याने आवाज करुन किडीला हूसकावून लावावे. तसेच क्लोरोपायरीफॉस व मेल्यॉथिऑन या किटकनाशकाची फवारणी करावी.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये टोळधाड आढळून आल्यास वरीलप्रमाणे उपायांनी थवा हाकलून लावल्यानंतर पुढच्या गावांतील लोकांना सतर्क राहून त्यांना सुध्दा याप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत सांगावे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर टोळधाड उंच झाडावर स्थिरावते, अशा स्थिरावलेल्या थव्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्या देखरेखीखाली सामुहिक फवारणी अग्निशमन बंबाच्या सहाय्याने करावी.
तसेच गावात ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, एचटीपी स्प्रेअर फवारणीचे विविध यंत्र उपलब्ध असल्यास त्यांनी फवारणीचे यंत्र सज्ज ठेवून फवारणीसाठी सहाय्य करावे.
ज्या शेतकऱ्याकडे भाजीपाला, फळपिक आहेत त्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बेंडीओक ८० डब्लू. पी., क्लोरोपायरीफॉस २० ईसी, ५० ईसी, डेल्टामॅथीन २.८ युएलव्ही व १. २५ युएलव्ही, डायपलूबेंझुर २५ ईसी लॅम्ब्डा सायहॅलोथीन २५ ईसी व १० डब्लू पी, मॅलॉथिऑन ५० ईसी व २५ ईसी व ९५ युएलव्ही किटकनाशकांची, औषधाची फवारणी करण्याचे सुचविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. परंतू सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.