लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोल भाव
मिळेल त्या भावात कापसाची विक्री
प्रतिनिधी देवानंद सानप :
सुरुवातीला कापसाच्या भावात वारंवार होत असलेल्या चढउतारामुळे तसेच मध्यंतरी परतीच्या पावसाने कापूस ओला झाल्यामुळे भावात घसरन झाली होती म्हणून चांला नंतर भाव मिळेल या आशेने गरजेनूसार कापूस विक्री करून राहीलेला साठवून ठेवला होता अशातच अचानक कोरोना महामारी संसर्गामुळे लाँकडाऊन झाले आणि बाजार पेठा बंद असल्याने कापूस कुठे विकावा अशा संभ्रमात शेतकरी अडकला होता माञ आता विक्री सुरु झाली आहे पण लाँकडाऊनच्या फटक्यामुळे कापसाला सध्या बेचाळीसे तर फरदळ कापसाला तिन ते साडे तिन हाजार भाव मिळत असून शेतकऱ्यांच्या कापसाला कवडी मोल भाव मिळत असून अडचणीतील काही शेतकरी मिळेल त्या भावात विक्री करीत आहे
शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून कापसाकडे पाहीले जाते या पिकाने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थीक गणीत बिघडविले आहे खरीपाचे नियोजन,आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण शेतीचे नियोजित कामे गुडीपाडव्यापासूनच केली जातात माञ यावर्षी कोरोना लाँकडाऊनचा फटका शेती व्यवसायाला बसला यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे बाजार भावाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना कापूस घरातच लाँकडाऊन करून ठेवण्याची वेळ आली व नंतर कोरोनाचा लाँकडाऊन मुळे बाजार पेठा बंद असल्याने सदर माल घरातच होता पण आता पून्हा खरेदी सुरु झाली असून कापसाला हमी भावापेक्षा खूपच कमी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल होवून भाव वाढीचे त्याचे स्वप्न भंगले आहे..