वणवा..
तुझ्या स्पर्शाने थांबले हे जग,थांबले मानवी मन,
दहशत अफाट,तुझी,आव्हान नसे पाऊस ना ऊन
उसंत घे तू आता, आणखी देह किती हा जावा ?
कोरोना, शांत कर हा वणवा, शांत कर हा वणवा.
हाहाकार तुझा तो आफ्रिका,आशिया,युरोपात,
शिरुनीया फुफ्फुसात,विटाळ केला माणुस-माणसात,
ठाण मांडुनी बसलास तू,प्रतिबंध कसा करावा..?
कोरोना, शांत कर हा वणवा, शांत कर हा वणवा.
उजाड पाडली वाट, जिकडे -तिकडे शुकशुकाट,
संरक्षणार्थ लाखो जीवांच्या, डॉक्टर, सेवक, पोलीस उभे ताठ,
मानवी बळातच अंत तुझा, अदमास तुलाही हा असावा..
कोरोना शांत कर हा वणवा, शांत कर हा वणवा.
शिस्त दिली तू खरी, स्वच्छतेची, स्व-आरोग्याची,
सावचित्त बनलेत सारे, कसोटी ही संयम,धैर्याची
निर्जन झाली ही क्षमा, थोडी रजा तू घ्यावा..
कोरोना,शांत कर हा वणवा, शांत कर हा वणवा.
संसर्गाचे थैमान तुझे ते धास्ती लहान मोठ्याला,
व्याकुळ झाले हे जन, अन्न मिळेना पोटाला,
ओसरू दे हा विळखा, दयाळू तू सुद्धा व्हावा..
कोरोना शांत कर हा वणवा, शांत कर हा वणवा.
- अक्षय संजय सवाळे
आर्वी, जिल्हा वर्धा. मो.९५६१६३९८६२.