अमरावती : मसानगंज कोरोना रुग्णाचे निधन
अमरावती येथील मसान गंज परिसरातील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीला ताप, श्वसन अडथळा आदी कारणामुळे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज कडून कोविड रुग्णालयाकडे रेफर करण्यात आले होते. सदर रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यानंतर सदर रुग्णाचे आज कोविड रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट swab घेणे आदी प्रक्रिया होत आहे.
अद्यापपर्यंत आढळलेले पॉज़िटिव नमुने : ७८
एकूण १२ मयत,
उपचार साठी ६० दाखल,
१ जीएमसी नागपूरला दाखल,
५ बरे होऊन घरी गेलेले