राष्ट्रीय महामार्गावर बाहेर जिल्हयातून येणारे वाहन उभे
गौरव सोमकुवर :
कारंजा :- सध्या वर्धा जिल्हा हा ग्रीन झोन जिल्हा असून प्रशासन व यंत्रणा योग्य पध्दतीने ग्रीन झोन ठेवण्यात यशस्वी झाला आहे मात्र बाहेर जिल्हयातून वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांने कोरोनाचा धोका उधभवू शकतो जिल्हातील कारंजा , तळेगाव ,सारवाडी हे गाव महामार्गाला जोडून असल्याने नागपूर अमरावती अश्या अनेक जिल्हयातून मालवाहू व बाहेर जाणाऱ्या चारचाकी वाहन कारंजा शहरातील महामार्गावर उभे असल्याचे चित्र आहे
दिवसेंदिवस इतर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्ण वाढत असताना बाहेर जिल्हयातून येणाऱ्या वाहनांचा थांबा हा कारंजा शहराच्या महामार्गावर होत असल्याचे चित्र आहे महामार्गावर एकमेव कारंजा शहरातील मार्केट सुरू असल्याने किराणा ,फळ चपल, कपडे चे दुकाने असल्याने बाहेर जिल्ह्यातून येणारे वाहन उभे करून चालक , व प्रवासी काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मार्केट मध्ये येत नागपूर आणि अमरावती जिल्हा रेड झोन जिल्हा आहे या जिल्हयातून हे वाहन येत असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका उधभवू शकल्याच बोलल्या जात आहे या कडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.