वर्धा ब्रेकिंग : आर्वी तालुका १३ व १४ मे ला बंद - जिल्हाधिकारी
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा कोरोना ममुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली त्यानंतर प्रशासनाने वर्धा जिल्ह्यात २ दिवसाचा बंद जाहीर केला होता, परंतु नुकत्याच आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आर्वी तालुक्यात पुन्हा १३ व १४ मे रोजी जीवनावश्यक्य वास्तूचे दुकाने वगळता सर्व तालुका बंद चे आदेश पारित केले आहे.
आर्वी तालुक्यात रुग्ण मिळण्याची शक्यता :
आर्वी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली, त्यामुळे नजीकच्या भविष्यात आर्वी तालुक्यात कोविड १९ या आजाराचे रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शक्यता सुद्धा प्रशासनाने व्यक्त केली आहे.