पोलीस कर्मचाऱ्यांला धडक देणाऱ्या आरोपींना ४८ तासात अटक

पोलीस कर्मचाऱ्यांला धडक देणाऱ्या आरोपींना ४८ तासात  अटक

पोलीस कर्मचाऱ्यांला धडक देणाऱ्या आरोपींना ४८ तासात अटक

कारंजा पोलिसांची कामगिरी 


कारंजा :-  धर्ती चेकपोस्ट वर पोलीस कर्मचाऱ्यांला धडक देऊन पसार झालेल्या वाहन व आरोपीना ४८ तासात अटक  कारंजा तालुक्यातील धर्ती चेकपोस्ट वर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी वासुदेव तायवाडे  वाहनाच्या धडकेत जखमी झाले केले होते  .

ता १ च्या मध्यरात्री पोलीस कर्मचारी ला  जखमी झाल्याची घटना  रात्री  च्या दरम्यान घडली होती  कोरोना विषाणूच्या प्रधुरभाव पाहता राज्यात जिल्हाबंदी चे आदेश आहे कोणीही छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करू नये यासाठी  जिल्ह्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे

काटोल कारंजा या रोडवरील धर्ती गावाजवळ जिल्हा सीमेची चेकपोस्ट लावण्यात आली आहे ता. 1  रात्री च्या दरम्यान कारंजा मार्गावरून काटोल कडे जात असलेल्या भरधाव  वाहनाने  पोलीस कर्मचारी वासुदेव  तायवाडे वय 54 आर्वी पोलीस स्टेशन कार्यरत  हे धर्ती चेकपोस्ट वर आपले कर्तव्य बजावत असताना भरधाव वेगाने दोन वाहनाने धडक देऊन  बॅरिकेट तोडून पसार झाले होते  

यात वासुदेव तायवाडे यांना जोरदार  धडक लागल्याने  पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते   कारंजा पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवले व ४८ तासात आरोपींना अमरावती येथून अटक केली यात MH 05BH 5924, MH 27 X5739 या वाहनसह इम्रान शेख चांद(३१) एजाज हुसेन अरबर (२५) रा. छाया नगर ,कुरेशी मोहहला अमरावती येथून अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे , पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद वानखेडे, नितेश वैध निलेश मुंडे,  यांनी केली आहे
Previous Post Next Post