आग लागलेल्या गावाला आमदार व जिल्हापरिषद अध्यक्षाची भेट

कारंजा -  भालेवडी गावाला अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या ची नुकसान ची पाहणी करण्यासाठी आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे व जिल्हापरिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी भेट दिली.

आग लागलेल्या भालेवाडी गावाला आमदार जिल्हापरिषद अध्यक्षा ची भेट 

प्रतिनिधी गौरव सोमकुंवर : 

कारंजा :-  भालेवडी गावाला अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या ची नुकसान ची पाहणी करण्यासाठी आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे व जिल्हापरिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी भेट दिली.  

काल दुपारी बारा वाजता च्या दरम्यान गावातील चार  गोठ्याना अचानक आग लागली या काही काळातच  आगीने मोठ्या प्रमाणात रुद्ररुप घेतल्याने आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जाळून खाक झाले यात गोठ्यात बांधलेल्या गोर्याचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला. 

लवकर आग  आटोक्यात आणण्यासाठी भालेवाडीचे सरपंच विकास दुपारे व  सचिव दहिवडे यांनी लहान मोठया सह गावकऱ्यांन सॊबत मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला   त्यामुळे मोठा अनर्थ टळला

काल झालेल्याला आगीत नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज  जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची मागणी आमदार केचे यांनी केली आहे,

तहसीलदार यांनी योग्य सहकार्य न केल्याचा आरोप गावकरीनी आमदार दादाराव केचे यांनी सांगितल्या नंतर आमदार केचे यांनी थेट जिल्हाधिकारी यांना मोबाईल द्वारे संपर्क करून आग लागलेल्या ठिकाणी  सहकार्य न केलेल्या अधिकाऱ्यांना  निलंबीत करण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी जिल्हाधिकारी यांना केली यावेळी जी प अध्यक्ष सरिता गाखरे , भाजप तालुका अध्यक्ष मुकुंदराव बारंगे , विजय गाखरे ,  किशोर भांगे , मारोती चोपडे, दिनेश ढोबळे , विकास दुपारे ,सारंग भोसले सचिव दहिवडे व तहसील कर्मचारी उपस्थित होते. 



Previous Post Next Post