नाशिकवरून नव्या सायकल खरेदीकरून निघाले झारखंडला

नाशिकवरून नव्या सायकल खरेदीकरून निघाले झारखंडला

परप्रांतीय कामगारांचा लोंढा थांबता थांबेना
नाशिकवरून नव्या सायकल खरेदीकरून निघाले झारखंडला

प्रतिनिधि गौरव सोमकुंवर : 

कारंजा :  नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग वरून आपल्या गावाला जाण्यासाठी अनेक कामगारांचा लोंढाच निघालेला दिसत आहे दररोज या महामार्गने शेकडो कामगार घराच्या दिशेने जाताना दिसत आहे.

देश्यात लॉकडाऊन झाल्याने जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच बंद पडल्याने अनेक परप्रांतीय कामगाराना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांवर उपासमारी वेळ आली आहे, आता लॉकडाऊन उघडण्याचा अंदाज दिसत नसल्याने त्यामुळे मिळेल त्यावेळेत गावाला जाण्याची संधी कामगार शोधत आहे, 

कोणी पायदळ तर ट्रेलर वाहनाने जात आहे आता काही कामगार चक्क नवीन सायकल खरेदी  करून गावाच्या दिशेने निघालेले दिसत आहे. आज कारंजा शहरातून समोर नागपूर कडे जात असलेले काही युवक सायकल ने जाताना दिसले त्यांच्याकडे चक्क नवीन सायकलने ते प्रवास करत असल्याने दिसले याबाबत त्यांना विचारना केली असता स्वतः गावाला जाण्यासाठी प्रत्येकांनी चार हजार रुपयांच्या दराने सायकल खरेदी कल्याचे सांगितले आणि सायकलने आता गावाच्या दिशेने निघालो आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर अनेक ठिकाणी जिल्ह्यातील सीमा बंदी केले आहे त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात
आले आहे मात्र कामगारांचा लोंढा तेथूनही येत असल्याने या कामगारांना अडविण्यात येत नाही जर यातील कोणी कोरोना ग्रस्त असलास आपल्या जिल्ह्यात धोका निर्माण होईल यामुळे याना अडविण्यात येत नसावा असा अंदाज आता व्यक्त होत आहे कामगारांना अडविले तर त्यांच्या डोकेदुखी आपल्या मागे लागेल यामुळे या कामगारांना जिल्हा सीमा बंदीवर अडविण्यात येत नाही. 

नाशिकवरून नव्या सायकल खरेदीकरून निघाले झारखंडला

निंबु खाऊन एनर्जी मिळवून पुढील प्रवास

झारखंड येथे सायकल ने जात असलेलं सात कामगार ठाणेगाव शिवारात राष्ट्रीय महामार्ग थांबलेलं दिसले आले यावेळी ते थकून गेले होते आणि काही जण पाणी पीत होते तर काही जण निंबु खात होते हजारो किलोमीटरचा सायकल ने प्रवास करत असताना आपल्या शरीरात थकवा दूर करण्यासाठी निंबू खाऊन एनर्जी घेऊन सायकलने प्रवास करत होते.

जिथे मिळेल तिथे खायचं आणि समोर निघायचं असा आमचा प्रवास सुरू केला आहे आज चार दिवस झाले येथे पोहचलो अजून काही दिवस आम्हाला सायकलने जायचे आहे कोणतेही वाहन नसल्याने आम्ही नवीन सायकल खरेदी करून गाव गाठायचं आहे. येथे राहून अजूनही लॉक डाऊन उघडणार नसल्याने आम्ही जेवढ्या लवकर गावाला जाऊ तेवढं आम्हाला आशा करत आहे. त्यातील एका कामगाराने व्यथा मांडली.

Previous Post Next Post