वर्धा । आर्वीत पुन्हा कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

वर्धा । आर्वीत पुन्हा कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण 


प्रतिनिधी : मयूर वानखडे 

वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज पुन्हा आर्वी मध्ये कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण महिला असून तिची अकोला ते आर्वी अशी ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

अकोला वरून आर्वी माहेरी आली महिला :  

सदर महिला, एक छोटे बाळ व एक पुरुष असे तिघे अकोला वरून आर्वी मध्ये दाखल झाले होते. त्यांना आधीच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. महिलेची तब्बेत बिघडल्याने तिला सेवाग्राम कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आज तिचे स्वाब टेस्ट पॉजिटीव्ह आले आहे. 

कुटुंबातील व्यक्तींना केले क्वारंटाईन : 

या महिलेच्या संपर्कातील सर्व कुटुंबाना प्रशासनाने आर्वी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आसोलेशन वार्ड मध्ये दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे. संपर्कतील इतर लोकांचे सुद्धा स्वाब टेस्ट घेण्यात आली असून त्यांचा चाचणी अहवाल येणे बाकी आहे. 

आर्वीतील सिंधी कॅम्प केला सील : 

सदर महिला आर्वी येथील सिंधी कॅम्प येथे वास्तव्यास होती त्यामुळे त्या परिसराला प्रशासनें सील केले असून आदिवासी होस्टेल पासून चा संपूर्ण सिंधी कॅम्प परिसर सील केला असून प्रशासनाची रीतसर कार्यवाही सूरु आहे. 


Previous Post Next Post