जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होताच कारंजा शहरात कडेकोट बंदोबस्त
गौरव सोमकुंवर
कारंजा :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने संपूर्ण यंत्रणा खळबळून जागी झाली आहे आर्वी तालुक्यातील हिवरातांडा येथील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचा प्राप्त अहवाल पोजीटीव्ह निघाल्याने हिवरातांड गावच्या आजूबाच्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सर्व सीमा सील करण्यात आल्या.
सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व लोकांना विलगिकरन करण्याची प्रक्रिया सुरू आज गावाच्या सीमा बंद केलेल्या मध्ये कारंजा व आर्वी तालुक्यातील गावांचा समावेश आहे जिल्हयात विशेष खबरदारी बाळगता जिल्ह्यातील औषधी ची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ पुढील आदेशपर्यंत दोन दिवसकरिता बंद ठेवण्याचे निर्देश आले आहे कारंजा शहरासह ग्रामीण भागात सर्व यंत्रणा सज्ज झाल्यापासून शहरातील मुख्य रोडवर पोलिसांचा कडा पहारा लावण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहे.