जीन ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू



जीन ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू 

शॉर्ट सर्किट मुळे लागली आग, अंदाजे १० कोटिच्या वर नुकसान 


प्रतिनिधी - अतुल दंढारे

नरखेड :  तालुक्यातील घोगरा येथे असलेले दान जिनीग ला आज दुपारी एक ते दीड च्या दरम्यान शॉर्टसर्किट मुळे जिनीग ला आग लागली,  यात एका इसमाचा होरपळून मृत्यू झाला असून मृतकाचे नाव  किसना दत्तुजी गोरे वय ३५ वर्ष राहणार लोहारा  असे आहे. 

आगीत १०००० क्विंटल कापूस तर १००० च्या वर कापसाची गाठी चे नुकसान 

आगी मध्ये सुमारे १००००, क्विंटल कापूस तर १००० च्या वर कापसाच्या गाठी चे जळुन राख रांगोळी झाली यामध्ये १० कोटी च्यावर नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहिती आहे.

🔺 स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर 

दाण काटन  जिनीग मध्ये १८ मे पासून शासकीय फेडरेशन च्या खरेदीला सुरुवात झाली होती,  आग लागल्याची माहिती मिळताच काटोल , नरखेड , मोवाड , वरूड जिल्हा अमरावती , आर्वी जिल्हा वर्धा , येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या त्यांनी आगी वर नियंत्रण मिळविले. 

यावेळी गावातील नागरिक यांनी व कापूस विक्रीसाठी नेण्यारा शेतकऱ्यांनी सुध्दा आग विझविण्यात मद्दत केली. 
Previous Post Next Post