मजुरांना घेऊन जात असलेली बोलेरो उलटली
कारंजा :- कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण देश भयभीत झाला असून परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहणाने आपल्या गाव जवळ करीत आहे आज भिवंडी वरून अलाहाबादला कडे निघालेल्या बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ठाणेगाव नजीक राष्टीय महामार्गावर उलटली या अपघातात 33 मजूर जखमी झाले असून यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींमध्ये तीन महिलांसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूर आपल्या मूळगावी परतण्याचा धडपाळीत आहे काही मजूर भिवंडी येथून बोलेरोने अलाहाबादच्या दिशेने जात असताना गाडी भरधाव वेगात होती. नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सूटला. त्यामुळे बोलेरो गाडी जागेवरच उलटली झाली. या अपघातात तब्बल 33 मजूर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.