वर्धा । कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

वर्धा । कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

वर्धा । कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू 

वर्धा : वाशीम येथील कोरोनाबाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात पहाटे  2 वाजता  मृत्यू झाला.  8 मे रोजी हृदय रोगाच्या उपचारासाठी  सावंगी येथे  दाखल झाले होते. सोबतच पॅरालिसिस आणि  बी पी या आजारानेही त्रस्त होते.   

सदर  रुग्णाचा 10 मे रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सेवाग्राम  येथील कस्तुरबा रुग्णालायत  पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले होते.  या 63 वर्षीय रुग्णाची प्रकृती मागील 8 दिवसांपासून  गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सुद्धा लावण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. 

आज पहाटे दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धेतच  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Previous Post Next Post