स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर, कोरोनाच्या भीषण परिस्थितीत जनतेचे काय ?

स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर, 

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत जनतेचे काय ?


प्रतिनिधी राजेश सोळंकी :

वर्धा जिल्हा रास्त भाव दुकानदार व रॉकेल संघटना विदर्भ रास्त भाव दुकानदार संघटना च्या वर्तीने संघटनेची जी मांगणी केली आहे ती  ३१ मे पर्यंत जर मान्य झाली नाही, तर स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे. 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वर्धा जिल्हाचे पुर्ण दुकानदार १ जून पासून कोणतीही चलन भरना व धान्य वाटप करणार नाही. 

काय आहे स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी 


१) महाराष्ट्र मध्ये कोरोना वायरस मुळे ५ दुकानदाराचा मृतु झाला आहे त्यांना ५० लाखा चा विमा दयावे तसेज           महाराष्ट्रात पुर्ण दुकानदारांना विमा कवच मंजूर करावे. 

२) माहे एप्रिल मे जून साठी फ्री मध्ये दिलेले तांदुळ  व  दाळ  चे कमिशन त्वरित दयावे. 

३) सर्व दुकानदार व मदतनीस साठी पीपीई किट दयावे.

४) जो पर्यंत कोरोना चा पुर्ण पणे निवारण होत नाही तो पर्यंत कार्ड धारक चा अंगठा न घेता नाॅमिनी  चा अंगठा         घेण्याचा आदेश दयावे.

५) तामिडनाडु  मध्ये दुकानदारांना मानधन देत आहे तसेच आम्हाला मानधन दयावे

अश्या मागणीचे निवदेन स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासनाला दिले आहे.
Previous Post Next Post