त्या आगग्रस्त कुटुंबांना रेड क्रॉसची मदत
प्रतिनिधी राजेश सोळंकी:
आर्वी तालुक्यातील गुंमगाव येथील लठीरामजी सलामे यांचे घर आगीत जळून खाक झाले या घटनेची व त्यांच्या परिस्थितीची माहिती सरपंचाने येथील रेड क्रॉस सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांना दिली.
आर्वी रेड क्रॉस सोसायटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लगेच गुमगाव येथे जाऊन धान्य किराणा भांडीकुंडी कपडे आदी सर्व गृह उपयोगी साहित्य या कुटुंबाला वितरित केले त्यामुळे या आगग्रस्त कुटुंबांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.