कृषी आधारित उद्योजकांसाठी सुवर्ण संधी
उत्कर्ष - पं.दे. कृ. वि. ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर (राबी) चा स्तुत्य उपक्रम
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवां साठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे.केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नासोबतच शेती पूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी यामाध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल.
याअंतर्गत उत्कर्ष- पं.दे. कृ. वि. (राबी) यांच्या तर्फे नव उद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामधे नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री - सीड स्टेज फंडींग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरीत करण्यासाठी सीड स्टेज फंडींग प्रोग्राम चे आयोजन केले असून, या कार्यक्रमा अंतर्गत नवउद्योजक व युवकांना मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन ₹ ५ लाख पर्यंत चे आर्थिक सहाय्य पुरविणे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या ऊत्पादनांसाठी ₹ २५ लाख पर्यंत चे आर्थिक सहाय्य पुरविणे असे आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नव उद्योजकांना ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्याचे प्रशिक्षण, विशेष तज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ठ तांत्रिक मार्गदर्शन, इंनक्यूबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येतील.
सदर योजना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राबवली जात असून ग्रामीण भागातील शेतकरी व नव उद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहिती www.utkarshrabiakola.com किंवा www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर योजना डॉ.एस.जे. गहूकर, मुख्य अन्वेशक (ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर) हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम. भाले, डॉ.पी.जी.इंगोले अधिष्ठाता (कृषी) डॉ. पं.दे. कृ. वि., अकोला यांचे मार्गदर्शनाखाली राबवत असुन डॉ. ए. एन. पासलावार सह-अन्वेशक (राबी), श्री.एन.एस.गुप्ता सह-अन्वेशक (राबी) हे या साठी सहकार्य करीत आहेत.