अमरावती व वर्ध्यात टोळधाड पक्षांचे आक्रमण - पिकांचे नुकसान


अमरावती व वर्धा जिल्ह्यात मध्यप्रदेशातून आलेल्या टोळधाड पक्षांनी आक्रमण केले 
या टोळधाड पक्षांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. 
मोर्शी वरुड व व वर्ध्यातील आष्टी  तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मोसंबी संत्रा, भाजीपाला याची  मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. टोळधाड पक्षांनी मोसंबी संत्रा भाजीपाला पिकांवर आक्रमण केले असून या टोळधाड पक्षांनी पिकांचे नुकसान करणे सुरू केले असल्याने शेतकरी या तोळधाड पक्षाच्या कचाट्यात सापडलेला आहे. 

टोळधाड पक्षी ज्या शेतात थांबेल त्या शेताचे रात्रभरात नुकसान करतात. आष्टी तालुक्यातील साहूर वडाळा अंतोरा बेलोरा खांबित, किनाळा या भागांमध्ये तोळधाड पक्षाने आक्रमण केले आहे. याआधीही आष्टी तालुक्यात अंदाजे 1970 ते 72 च्या दरम्यान तालुक्यात टोळधाड पक्षांनी आक्रमण केले होते. 

त्यावेळेस उपाययोजना म्हणून शासनाने वरून हेलिकॉप्टरद्वारे फवारणी केली होती. त्यानंतर तब्बल पन्नास वर्षानंतर तालुक्यात टोळधाड पक्षांनी आक्रमण केले असून सदर टोळधाड पक्षाच्या आक्रमणाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली असून झालेल्या नुकसानाची त्वरित पहाणी करून झालेल्या नुकसानाची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

पहा व्हिडीओ बातमी सविस्तर :



अधिक बातम्या व यशोगाथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा 
Previous Post Next Post