वर्धा । कोरोना - ९६० नमुन्या पैकी १० पॉजिटीव्ह, तर ३९ अहवाल प्रलंबित, उर्वरित निगेटिव्ह
जिल्हयात आज एकही नविन रुग्ण नाही
वर्धा, दि.21 : जिल्हयात आज एकाही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नसून जिल्हयात आतापर्यंत 10 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जिल्हयातील एकच रुग्ण आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.
जिल्हयात 10 कोरोना बाधित रुग्णाची नोद झाली आहे यामध्ये वर्धा- 1, वाशिम-1,अमरावती -4, नवी मुबंई-3, गारेखपुर उत्तरप्रदेश 1 रुग्ण असून यापैकी वर्धा येथील रुग्णांचा मृत्यु झाल्यामुळे सध्या 9 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
मृत्युबद्दल अधिकची माहिती
आज पर्यंत झालेल्या नोंदीनुसार 10 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 1 महिला रुग्णाचा मृत्यु झाला असुन सदर महिला Bronchial Asthma या आजाराने ग्रासीत होती.
प्रयोगशाळा तपासण्या
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 960 नमुन्यापैकी 911 व्यक्तींचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. तर 10 व्यक्ती पॉझीटिव्ह आले आहेत. व 39 अहवाल प्रलंबित आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
जिल्हयात ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. जिल्हयात सध्या 1 कंटेनमेंट झोन (तालुका आर्वी) क्रियाशील असून एकुण 41 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी आजपर्यंत 11 हजार 395 लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
विलगीकरण
आतापर्यंत जिल्हयात 33 हजार 408 लोक गृहविलगीकरणामध्ये होते व त्यापैकी 23 हजार 397 यांचा गृहविलगीकरण कालावधी संपुष्टात आला असून सद्यास्थितीत एकुण 10 हजार 11 व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तसेच 126 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.