वर्धा ब्रेकिंग । आर्वी तालुक्यात पुन्हा कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण
प्रतिनिधी मयूर वानखडे :
आर्वी : तालुक्यातील रोहणा येथील २५ वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर युवकाची सुद्धा मुंबई ते रोहना अशी ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याचे कळते.
हा युवक मुंबई येथे कामगार होता,लॉकडाउन मुळे काम नाही आणि जवळ पैसा नाही म्हणून तो पायी चालत तर कुठे मिळेल त्या वाहनाने दि.21मे ला सकाळी रोहना येथे पोहचला, मुंबई येथून आला असल्याने स्थानिक प्रशासनाने व आरोग्य अधिकारी डॉ कुरवाडे यांनीं तपासणी करून त्याची आर्वी येथील क्वारंटाईन सेंटरला रवानगी केली, तपासणी अंती सदर युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट मिळाले आहे.
गावातील लोकांनी सतर्क राहणे आवश्यक
गांवातील सर्व नागरिकांना विनंती की,आपल्या घरी, शेजारी मोहल्यात किंवा गावात वर्धा जिल्ह्याच्या बाहेरून कुणीही व्यक्ती आल्याची माहिती मिळताच सरपंच , प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका,ग्रामसेवक, पोलीसपाटील ,तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांपैकी कुणालाही माहिती द्या जेणेकरून अश्या व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होमक्वारेंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारेंटाईन करून आपल्या गावाला कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावा पासुन वाचवितां येईल. शक्यतो घरीच थांबा ,मास्क लावा, साबणाने वारंवार हात धुवा,सुरक्षित अंतर ठेवा.