शेतकऱ्यांनी सुधारित धान लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - डॉ. जि.आर श्यामकुवर
भंडारा जिल्हा धान लागवडीचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे .आणि त्यातच काही दिवसांनी खरीप हंगामाला सुरवात होत आहे . या परिचित शेतकऱ्यांचा मनात अनेक प्रश्न होते. त्यांचे निराकरण करण्याचा दृष्टीने दिनांक १८/५/२०२० रोजी रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा भंडारा व कृषि संशोधन केंद्र साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हातील ३५ शेतकऱ्यांचा डॉयल आउट ऑडिओ कॉफरस च्या साहाय्याने धान पिकावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक कोरोंना आजाराच्या पऱ्शोभूमीवर भंडारा जिल्यामध्ये लॉकडाऊन असल्या मुळे शेतकऱ्यांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी राहुल मेश्राम यांनी केले होते.
प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ. जि. आर. श्यामकुमार (वरिष्ठ भात पैदासकार) कृषि संशोधन केंद्र, साकोली यांनी उपस्तीत शेतकऱ्यांचा कृषि संशोधन केंद्र साकोली येथे उपलब्ध असलेल्या धानाच्या विविध जाती, यामध्ये लवकर येणारे वाण कोणते तसेच रोगास प्रतिकरण वाण याबदल संविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगामात धानाची लागवड करायची असल्यास बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. व धान पिकावर बीज प्रक्रिया कशी करावी यावर मार्गदर्शन केले. धान लागवडीपुवी जमिनीची मशागत कश्या पद्धतीने करावी. तसेच धानवर येणारे विविध रोग व त्यावर उपाय त्याचप्रमाणे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरीव धान लागवड पध्दतिचा अवलंब करावा, त्यामुळे मजुरावरील खर्च कमी होईल व पाण्याची बचत तसेच शेतकऱ्याचा रोहणीचा खर्च वाचेल. या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बी. एन् चौधरी (कनिस्ट कीड तज्ञ) कृषी संशोधन केंद्र, साकोली. यांनी धान पिकावर येणाच्या विविध कींडी तुडतूडा , खोडकिडा , लष्करी अळी , गदमाशी तसेच करपा, कडकरपा, पर्णकोश, मानमोडी या विविध रोगाबद्दल व त्यावरील उपाय बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ३० गावातील ३५ शेतकऱ्यांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.